Maharashatra Loksabha: जानकर मविआ सोडून महायुतीसोबत का? स्वतः जानकरांनीच सांगितलं कारण

Mahadev Jankar : महादेव जानकर महायुतीसोबत राहणार असून त्यांना परभणीमधून उमेदवारी देण्यात आलीय. दरम्यान जानकर महाविकास आघाडीसोबत का नाहीत याचा खुलासा त्यांनी केलाय.
Mahadev  Jankar
Mahadev Jankar
Published On

(सचिन गाड, मुंबई)

Mahadev Jankar Maharashtra Loksabha Election:

महादेव जानकर यांची साथ महायुतीला का मिळाली? जानकर महाविकास आघाडीसोबत का नाहीत, याची खुलासा खुद्द जानकर यांनीच केलाय. हा खुलासा करताना जानकर यांनी अजब कारण सांगितलंय. महादेव जानकराचे कारण ऐकल्यानंतर त्यांचे धोरण दुटप्पी आहे का, असा सवाल केला जात आहे. (Latest News)

लोकसभा निवडणुकीच्या घोषणा होताच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीची तयारी सुरू झाली. आघाडी आणि युतीमधील अनेक घटक पक्ष उमेदवारीसाठी प्रमुख राजकीय पक्षांसोबत भेटीगाठी वाढवल्या. यात महादेव जानकर यांची रासपदेखील मागे नव्हती. लोकसभा निवडणुकाजवळ येताच राजकीय घडामोडींना वेग आला होता. महायुतीसोबत चर्चेची घडी बसत नसल्याचं पाहत जानकर हे शरद पवार यांच्या भेटीला गेले. महादेव जानकर महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती.

माढा मतदारसंघातून महादेव जानकर आघाडीकडून लोकसभा लढवतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. महादेव जानकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये २० मार्च रोजी बारामतीत जवळपास एक तास चर्चा झाली होती. माढा आणि परभणी या दोन्ही मतदारसंघांतील नागरिकांचे दररोज जवळपास एक हजार फोन येतात. यामुळे आपण महाविकास आघाडीकडे ३ जागा मागितल्या होत्या. मात्र तीनपैकी २ मिळाव्यात, अशी आमची मागणी असल्याच जानकर म्हणाले होते.

Mahadev  Jankar
Sharad Pawar Group: भाजपा- शिंदे गटाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान, शरद पवार गटाने निवडणूक आयोगात केली तक्रार

दरम्यान भाजपकडून लोकसभेसाठी जाहीर दुसरी यादीत माढा लोकसभेसाठी रणजित नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात होती त्यामुळे महादेव जानकर नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. परंतु देवेंद्र फडणीवस यांच्या भेट घेत त्यांनी महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. जानकर महाविकास आघाडीसोबत जात महायुतीला धक्का देतील असं वाटत होतं. मात्र फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा करत एका जागेवर समाधानी झाल्याचं जानकर म्हणाले. दरम्यान महादेव जानकरांनी महाविकास आघाडीसोबत न जाण्याचा निर्णय का घेतला याचं कारण त्यांनी दिलंय.

शरद पवार यांच्यासोबत न जाण्याबाबत जानकर यांनी अजब कारण दिलंय. मविआकडून मी ३ जागा मागितल्या पण मला त्यांनी १ जागा दिली म्हणजे केवळ ३३ टक्के मात्र महायुतीकडून मी २ जागा मागितल्या होत्या. त्यानी मला एक जागा दिली म्हणजे ५०% शरद पवारांसोबत न जाण्याबाबत जानकरांच धोरण दुटप्पी? आहे का असा सवाल केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com