NCP Candidate List: ब्रेकिंग! राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ५ उमेदवार जाहीर; नगरमधून निलेश लंके 'तुतारी' वाजवणार

NCP Sharadchandra Pawar Party Loksabha Candidate List: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या उमेदवारांची घोषणा केली.
Nilesh Lanke Will join NCP Sharad Pawar Group
Nilesh Lanke Will join NCP Sharad Pawar GroupSaam TV

रुपाली बडवे, मुंबई|ता. ३० मार्च २०२४

NCP Sharad Pawar Group Candidate List:

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज (ता. ३० मार्च) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये वर्ध्यातून अमर काळे, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुरमधून अमोल कोल्हे, नगरमधून निलेश लंके, तसेच दिंडोरीमधून भास्करराव भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

(Maharashtra Loksabha Election 2024)

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकींच्या पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिली यादी जाहीर केली असून यामध्ये वर्ध्यात नुकतेच काँग्रेसमधून शरद पवार गटात आलेले अमर काळे, बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरुरमधून अमोल कोल्हे, दिंडोरीमधून भास्करराव भगरे, तसेच नगर दक्षिणमधून कालच अजित पवार गटातून आलेले निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

"भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी समविचारी लोकांनी एकत्र लढण्याचा निर्धार केला पाहिजे. काही लोक जर वेगळे लढण्याचा विचार करत असेल तर समविचारी मतांमध्ये विभागणी होईल. त्यामुळे सर्वांनी एकसंधपणे लढलं पाहिजे," असे आवाहनही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

Nilesh Lanke Will join NCP Sharad Pawar Group
Buldhana Lok Sabha Election 2024 : बुलढाणा मतदारसंघात महा लोकशाही विकास आघाडीचा उमेदवार जाहीर

या जागांवर तिढा?

दरम्यान, लोकसभेचे सातारा, माढा मतदार संघही शरद पवार यांच्या पक्षाकडे आहेत. मात्र या जागेवरील उमेदवार अद्याप घोषित करण्यात आलेले नाहीत. माढ्यातून धैर्यशिल मोहिते पाटील किंवा शेकापचे अनिकेत देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे तर साताऱ्यामधून बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nilesh Lanke Will join NCP Sharad Pawar Group
Kolhapur Lok Sabha: शाहू महाराजांच्या विजयासाठी उद्धव ठाकरे मैदानात; कोल्हापुरात घेणार जंगी सभा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com