Mahila Diwas Special : १००० महिलांची मोफत प्रसूती अन् ६ महिन्यांचा खर्च, कोथरूडच्या स्मिता पाटील यांचा आधार, वाचा

Women's Day Special Pune Social Worker Smita Patil Story: पुण्यातील सखी सुखदा वूमन वेल्फेअर फाउंडेशन हे खूप काम करत आहे. याअंतर्गत गरीब वस्तीतील गर्भवती महिलांना मदत केली जाते.
Women's Day Special
Women's Day SpecialSaam Tv
Published On
Summary

पुण्याच्या समाजसेविका स्मिता पाटील यांचे प्रेरणादायी काम

गरीब वस्तीतील गर्भवती महिलांना आर्थिक मदत

डिलिव्हरीपासून ते बाळ ६ महिन्याचे होईपर्यंत खर्च उचलते

सागर आव्हाड, साम टीव्ही प्रतिनिधी

माणसाला त्याच्या दुःखाच्या वेळेस किंवा गरजेला जो मदत करतो त्याला माणूस कधीही विसरत नाही. समाजात महिलांच्या प्रश्नांवर आजही अनेक लोक काम करत असून महिलांच्या आरोग्याच्या बाबत अनेक समस्या आपल्या पाहायला मिळतात. जर गर्भवती महिला असेल तर पहिल्या महिन्यापासून ते डिलिव्हरी होऊस तर महिलेला विविध तपासण्या कराव्या लागतात. गोरगरीब, वस्तीत राहणारी महिला असेल तर डिलिव्हरीच्या काळात तिला खूपच संघर्ष कराव लागतं. हीच बाब पुण्यातील सामाजिक काम करणाऱ्या स्मिता पाटील यांच्या लक्षात आली.

स्मिता पाटील यांनी वस्तीत राहणाऱ्या गोरगरीब गर्भवती महिलांवर काम करायला सुरवात केली आणि गर्भवती असल्यापासून ते मुलगा सहा महिन्याचा होऊ पर्यंत रुग्णालयाचा संपूर्ण खर्च तसेच डिलिव्हरीदेखील त्या मोफत करू लागल्या. आत्ता पर्यंत त्यांच्या संस्थेत फोन हजार गर्भवती महिलांनी नोंद केली असून एक हजार महिलांना मुल झाली आहे.

Women's Day Special
Pune Accident: पुणे-बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघात, भरधाव कंटेनरने ३ ते ४ वाहनांना उडवलं

सखी सुखदा वूमन वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने पुण्यातील कोथरूड परिसरातील गोरगरीब जनता तसेच वस्ती मध्ये राहणाऱ्या गर्भवती महिलांसाठी ही संस्था काम करत आहे. या संस्थेच्या माध्यमातून गर्भवती असल्यापासून ते पुण्यातील चांगल्या दीनानाथ रुग्णालयात डिलिव्हरी आणि मुलगा मुलगी झाल्यास तिच्या सहा महिन्याच उपचार मोफत केलं जात.या दोन वर्षाच्या काळात संस्थेत आत्ता पर्यंत दोन हजार जणांनी नोंदणी केली असून एक हजार महिलांना मुल,मुली झाली आहे.

याबाबत संस्थेच्या अध्यक्षा स्मिता पाटील म्हणाल्या की, आम्ही २०२४ मध्ये सखी सुखदा फाउंडेशनची सुरवात केली आणि या माध्यमातून आम्ही काम करायला सुरुवात केली.माझ्या अनेक डॉक्टर मित्र असून जे कोथरूड मधील गोरगरीब वस्ती मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी काम करतात. त्यांच्या कडून एक गोष्ट लक्षात आली की स्लम भागातील महिलांना चौथ्या आणि पाचव्या महिन्यापर्यंत कळत नाही की त्या गर्भवती आहे.

गर्भवती झाल्यावरदेखील त्या तपासण्याकडे लक्ष देत नाही. यावरच काम करायला आम्ही सुरुवात केली आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांना या संदर्भात आम्ही आमच्या सगळ्या गोष्टी सांगितल्याने त्यांनी लगेच याला सहकार्य केलं. आम्ही सखी सुखदा फाउंडेशनच्या माध्यमातून कोथरूड परिसरातील वस्ती तसेच जे काही गोरगरीब महिला आहेत त्यांच्या आरोग्यावर काम करायला सुरुवात केली अस यावेळी त्यांनी सांगितल.

त्या पुढे म्हणाल्या की, जेव्हा आम्ही कोथरूड परिसरातील गर्भवती महिलांच्या आरोग्य संदर्भात काम करायला सुरुवात केली तेव्हा कोणालाच विश्वास बसत नव्हता की आम्ही ती महिला गर्भवती झाल्यापासून ते डिलिव्हरी होईपर्यंत सर्व तपासण्या आणि खर्च करणार आहोत.पण हळूहळू जेव्हा लोकांना विश्वास बसला तेव्हा त्या आमच्या संस्थेशी जुळू लागल्या आणि या दोन वर्षात तब्बल दोन हजार महिलांनी आमच्याकडे नोंदणी केली आहेत.आम्ही कोथरूड मधील महिलांसाठी हे काम सुरू केलं आहे. यासाठी आम्ही पहिले त्या महिलेचा उत्पन्नाचा दाखला आणि त्यांचे कागदपत्रे मागून घेतो यानंतर मग कागदपत्र पूर्ण झाल्यावर संबंधित महिलेची नोंदणी केली जाते आणि ती ज्या महिन्यापासून गर्भवती असेल तेव्हापासून तिचं संपूर्ण चाचण्या औषधे तसेच डिलिव्हरी चांगल्या रुग्णालयात मोफत केल्या जातात.ही मोहीम फक्त कोथरूड पूर्ती मर्यादित न राहता पुणे शहरात राबविली गेली पाहिजे अस यावेळी त्यांनी सांगितल.

Women's Day Special
Success Story : १७ हजारात व्यवसाय उभारला, सहा महिन्यात १५ लाखांचा नफा; जयपूरमधील दोन बेस्टफ्रेंडची सोशल मीडियावर चर्चा

यावेळी एक महिला म्हणाली, की मी चार महिने झाले या संस्थेत येत आहे. इथ सर्व लोक चांगले असून सर्व तपासण्या तसेच सोनोग्राफी या मोफत होत आहे. एक धुणीभांडी करणारी आई म्हणाली की, माझी मुलगी आणि सून हिचं नाव इथ नोंदविण्यात आहे. असून मी धुणीभांडी करत असल्याने मला या दोघींची चिंता होत होती.जर मोठ्या रुग्णालयाची वेळ आली तर आपण पैसे कुठून आणायचे या सगळ्या गोष्टींचा टेन्शन मला येत होतं पण जेव्हा या संस्थेत नोंदणी झाली तेव्हापासून काहीच टेन्शन नसून सर्व तपासण्या चांगल्या होत असून चांगल्या रुग्णालयात आत्ता त्यांची डिलिव्हरी होणार आहे अस यावेळी त्यांनी सांगितलं.

Women's Day Special
UPSC Success Story: मालेगावच्या शेतकऱ्याची लेक IPS झाली; MPSC नंतर UPSCत घवघवीत यश; धनश्री अहिरे यांचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com