chief minister eknath shinde  Saam Tv
महाराष्ट्र

Eknath Shinde Big Announcement: शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून शिवप्रेमींना गिफ्ट; किल्ले रायगडावरून केल्या ३ मोठ्या घोषणा

Shivrajyabhishek Din : मुख्यमंत्र्यांनी किल्ले रायगडावरुन तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत.

Priya More

Raigad News: रायगडावर (Raigad) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सर्व शिवप्रेमींना आणि महाराष्ट्रातील जनतेला शिवराज्यभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यानिमित्त त्यांनी शिवप्रेमींसाठी मोठं गिफ्ट दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी किल्ले रायगडावरुन तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत.

किल्ले रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारण्यात यावी अशी मागणी आमदार भरत गोगावले यांनी केली होती. त्यांची ही मागणी मान्य झाली आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, 'भरत गोगावलेंनी केलेली मागणी सरकारने मान्य केली आहे. 45 एकर जागा शिवसृष्टीसाठी देण्यात आली आहे. शिवसृष्टीसाठी 50 कोटी रुपये देण्यात येणार आहे. जसजसे पैसे लागतील तसे पैसे देऊ. शिवसृष्टीसाठी पैसे कमी पडणार नाही. शिवरायांच्या आशिर्वादाने आणि प्रेरणेने आपण राज्याचा कारभार हाकत आहोत. त्यामुळे शिवरायांच्या स्वप्नातली शिवसृष्टी साकारण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.'

मुख्यमंत्र्यांनी प्रतापगडाबाबत देखील मोठी घोषणा केली आहे. प्रतापगड प्राधिकरण करावे अशी मागणी उदयनाराजे भोसले यांनी केली होती. त्याची ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. त्यानुसार आज मुख्यमंत्र्यांनी प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा केली. तसंच प्रतापगड प्राधिकरणाचे अध्यक्ष भाजप खासदार उदयनराजे भोसले यांना करण्यात आले असल्याचे देखील त्यांनी यावेळी जाहीर केले.

एकनाथ शिंदे यांनी यावेळी आणखी एक मोठी घोषणा केली ती म्हणजे भवानी तलवारीबाबत. त्यांनी सांगितले की 'लंडनच्या संग्रहालयातील भवानी तलवार आणि वाघ नख्या महाराष्ट्रात परत आणण्यासाठी सरकारचा प्रयत्न सुरु आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला मदत करतील. आपले हे स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.'

मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, 'शिवरायांच्या पराक्रमांमुळेच अखंड भारताला सुखाचे आणि स्वातंत्र्याचे क्षण अनुभवता आले. आपल्या माता-भगिनींचे जगणं सुसह्य झाले. साधु संत आणि देवळांचे रक्षण झाले. त्यामुळे आपण आजचा हा सोहळा पाहत आहोत. हा सोहळा म्हणजे शिवरायांच्या चरणी अर्पण केलेली एक पूजा आहे. हे सरकार सर्वसाान्याना न्याय देणारे आहे. रयतेच्या हक्काचे रक्षण करणारे आहे. शिवरायांच्या प्रेरणेने आम्ही सुरुवात केली आहे. सरकारने घेतलेला प्रत्येक निर्णय सर्वांच्या हितासाठी आहे. जनतेच्या प्रगतीसाठी आहे.'

तसंच, 'जावळी खोऱ्यातील मी शिवाजी महाराजांचा एक मावळा आहे. आमच्या राज्य कारभारामध्ये छत्रपतींची शिकवण आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही कारभार करत आहोत. यासाठीची प्रेरणा आम्हाला छत्रपतींकडून मिळत आहे. शिवाजी महाराज शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मागे उभे राहायचे. तसंच आपले सरकार देखील शेतकऱ्यांसाठी निर्णय घेत आहे. सरकारने 1 रुपयांमध्ये पिकविमा देण्याची घोषणा केली आहे. 12 हजार रुपये आपल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे.' तसंच, 'कितीही कष्ट पडले, कितीही मेहमनत करावी लागली तरी आणपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आम्ही कुठेही कमी पडणार नाही.', अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

SCROLL FOR NEXT