Shivaji Maharaj Rajyabhishek 2023: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं यंदाचे ३५० वे वर्ष आहे. किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. या सोहळ्यात शिवप्रेमींना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली. त्यांनी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. (Breaking Marathi News)
किल्ले रायगडावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी, प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा केली. इतकेच नव्हे तर, प्रतापगड प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा केली. उदयनराजे यांनी प्रतापगड प्राधिकरणाची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला मान देत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
"आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, आज या ऐतिहासिक सोहळ्याला ३५० वर्षे झाली. मी स्वत ला भाग्यवान समजतो, की या सोहळ्याला मला उपस्थित राहता आलं. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य लोकांचं काम कऱण्याची संधी आपल्याला मिळाली", अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या.
"आज लंडनच्या संग्राहलयात असलेल्या भवानी तलवार आणि वाघनख भारतात परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तेही लवकरच आपल्या महाराष्ट्रात येईल असंही शिंदे म्हणाले. तसेच रायगडावर शिवसृष्टीसाठी ४५ एकर जागा आहे, त्याला निधी द्या अशी मागणी आमदार भरत गोगावलेंनी केली होती. मी आताच त्याासाठी ५० कोटींचा निधी जाहीर करत आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सुद्धा किल्ले रायगडावरून शिवप्रेमींना संबोधित केलं. मोदीसाहेबांकडे जाऊ आणि शिवरायांचं दिल्लीतील स्मारक मार्गी लावू असं फडणवीसांनी सांगितलं. शिवस्मारक बांधण्याच्या कामासाठी पंतप्रधानांकडे आम्ही पाठपुरावा करू. याशिवाय, रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: प्रयत्न करतील. शिवसृष्टी उभारण्याच्या मागणीसाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पाठपुरावा करेन असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.