Maratha community supports to Gautami Patil
Maratha community supports to Gautami Patil saam tv
महाराष्ट्र

Gautami Patil News: गौतमी पाटीलला मराठा समाजाचा पाठींबा! घनशाम दराडेनी उंची बघून बोलण्याचा इशारा

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

Jalna News: प्रसिद्धीसाठी संघटनांनी गौतमीचा विरोध करू नये, असे म्हणत जालन्यातील मराठा कार्यकर्त्यांनी गौतमी पाटीलचं समर्थन केलं आहे. छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या घनशाम दराडेने मारण्याची धमकी देऊ नये, त्याने आपली उंची बघून बोलावं अशा इशारा मराठा कार्यकर्त्यांनी दिला आहे. तसेच जर मारण्याची धमकी देत असेल तर तिथून पुढे आम्ही बघून घेऊ असे देखील त्यांनी म्हटले आहे.

गौतमी पाटील हे नाव गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात प्रचंड गाजत आहे. आपल्या नृत्याने गौतमीने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलंय. प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या गौतमीवर आता टीका देखील होऊ लागली आहे. गौतमीने पाटील हे नाव लावू नये असा इशारा काहींनी दिला होता. यावर एक नवा वाद देखील निर्माण झाला.

यानंतर मराठा समाजातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. जालन्यातील मराठा कार्यकर्त्यांनी गौतमी पाटीलचं समर्थन केले आहे. गौतमी पाटील ही लोककला जोपासण्याचं काम करत आहे. काही लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी तिचा विरोध करत आहेत.

गौतमी पाटील ही एक कलाकार आहे आणि कला सादर करतांना काही आदा ती सादर करत असते. सुरेखा पुणेकर यांनी लावणीच्या माध्यमातून कला जोपासली, तशाच प्रकारची कला गौतमी जोपासत आहे. त्यामुळे विरोध करायचा म्हणून तिला विरोध करणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते गजानन देठे पाटील यांनी दिली आहे. (Breaking News)

दरम्यान घनशाम दराडेने केलेल्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. स्वतःला छोटा पुढारी म्हणणाऱ्या दराडेनी आपली उंची पाहून बोलावं. मारण्याची धमकी देणारा आणि तिला विरोध करणारा हा कोण? असे देठे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच घनशाम जर मारण्याची धमकी देत असेल तर तिथून पुढे आम्ही बघून घेऊ असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. (Latest Political News)

दराडेने याने शेतात काम करून भाषण द्यावं. ज्याला नाचता येत त्यांनी नाचावं, ज्यांना गाता येत त्यांनी गावं. कुठल्याही मराठा संघटना किंवा समन्वयक यांनी विरोध करायचा म्हणून विरोध करता कामा नये, अशी भूमिका घेत देठे पाटील यांनी गौतमी पाटील हिचं समर्थन केल आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uday Samant : छत्रपतींच्या गादीचा अपमान कोणी केला? बुधवारी कोल्हापुरात सगळं उघडं करणार : उदय सामंत

Sairat Movie: सुपरहिट सैराटला ८ वर्ष पूर्ण! आर्चीने शेअर केले कधीही न पाहिलेले खास फोटो

Sabudana Benefits: साबुदाणा आरोग्यासाठी फायदेशीर, वाचा फायदे

Heat Wave Alert in Mumbai : नागरिकांनो सावधान! मुंबईसह ठाणे-रायगडमध्ये येणार उष्णतेची लाट, आज आणि उद्या कसं असेल तापमान?

Food for Diabeties : मधुमेहाचे रुग्ण करु शकतात 'या' गोड पदार्थांच सेवन

SCROLL FOR NEXT