Heat Wave Alert in Mumbai : नागरिकांनो सावधान! मुंबईसह ठाणे-रायगडमध्ये येणार उष्णतेची लाट, आज आणि उद्या कसं असेल तापमान?

Heat Wave In Mumbai, Thane And Raigad: मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून (Weather Department) उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Heat Wave In Maharashtra
Mumbai, Thane And Raigad TemperatureYandex
Published On

आवेश तांदळे, मुंबई

राज्यामध्ये उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाढते तापमान आणि उकाडा वाढत चालल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशामध्ये सरकारकडून (Government) वारंवार नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. अशामध्ये मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून (Weather Department) उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत आज 38 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. रविवारी देखील मुंबईत, ठाणे, रायगड भागात अधिक तापमानाची नोंद झाली. तापमान सरासरीपेक्षा 4.8 अंशांनी वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात सलग दुसऱ्यांदा उष्णतेची लाट येण्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Heat Wave In Maharashtra
PM Modi Pagadi: पंतप्रधान मोदींसाठी खास 'दिग्विजय योद्धा पगडी', पुण्यात होणार भव्य स्वागत

सोमवारी आणि मंगळवारी तापमान अधिकच राहिल. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजताच्या दरम्यान घराबाहेर पडू नये. उन्हामध्ये जाणं टाळावं. जास्तीत जास्त पाणी प्यावे. सुती कपडे घालावीत, असे आवाहन केले जात आहे. वाढत्या तापमानामुळे राज्यात उष्माघाताचे रुग्ण वाढले आहेत. त्याचसोबत अनेकांना चक्कर येणे, अशक्तपणा यासारखा त्रास होत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे देखील सांगितले जात आहे.

Heat Wave In Maharashtra
शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात डायलिसिस सुविधा मिळणार मोफत, साई भक्ताकडून 24 लाखाच्या मशीनची देणगी

दरम्यान, राज्यात मुंबई, ठाणे, कोकण परिसरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, माठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तापमान चांगलेच वाढले आहे. याठिकाणचे कमाल तापमान ४० अंशापार पोहचले आहे. मुंबईमध्ये देखील तापमान वाढले आहे. मुंबईत सध्या ३८ अंशाहून जास्त तापमान नोंदवले गले आहे. रविवारी सोलापूर येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून त्याठिकाणचे तापमान ४३.७ अंश सेल्सिअसवर पोहचले होते. वातावरण बदलामुळे तापमान वाढले आहे.

Heat Wave In Maharashtra
Local train bogie derailed at CSMT: मोठी बातमी! CSMT स्थानकात शिरताना लोकलचा डबा घसरला; हार्बर वाहतूक विस्कळीत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com