
Rupali Patil Criticize Nitesh Rane: भाजपचे आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांची तुलना थेट नृत्यांगना गौतमी पाटीलशी केली होती, त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी राणेंचा समाचार घेतला आहे. नितेश राणे राऊतांची तुलना गौतमी पाटीलशी करत असेल तर भाजपचे नितेश राणे नाच्या आहेत का? असा धारदार पलटवार रुपाली पाटलांनी केला आहे.
'राजकारण किती खालच्या थराला नेणार?'
नितेश राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेताना रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, हे राजकारण किती खालच्या थराला नेणार आहात, भाजपचे वरिष्ठ नेते या वाचळवीरांना थांबवणार आहेत की नाही. जी महिला स्वत:च्या पोटासाठी जर तिचे काम करते तर तिला अशाप्रकारे हिणवणं भाजपच्या नेत्यांना शोभतं का? की भाजपच्या नेत्यांनी महिलांवर आन्याय करायचा, त्यांचं शोषण करायचं आणि त्यांना हिनवायचा विडा उचलला आहे? असा पलटवार रुपाली पाटलांनी केला आहे.
'नितेश राणे नाच्या आहेत का?'
रुपाली पाटील म्हणाल्या, नितेश राणेंना त्यांच्याच भाषेत बोलायचं असेल तर ते भाजपचे नितेश राणे नाच्या आहेत का? जरा स्वत:कडेही वाकून बघा असे म्हणत रुपाली पाटील यांनी संताप व्यक्त केला. नितेश राणे राजकारण किती खालच्या थराला नेणार? असा सवाल देखील त्यांनी केला. (Latets Political News)
नेमकं काय म्हणाले नितेश राणे?
राणे आणि शिवसेनेच्या ठाकरे गटात नेहमीच खटके उडत असतात. सिंधुदूर्ग येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नितेश राणे यांनी संजय राऊतांची तुलना थेट नृत्यांगना गौतमी पाटीलशी केली. "महाविकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत. रोज सकाळी मनोरंजन करतात. असं राऊतांना स्वत:लाच वाटत आहे, ते दूर झालं पाहिजे. त्या गौतमी पाटीलला मी विनंती करतो की तिचं मेकअपचं सामान राऊतांना द्यावं, अशी टीका नितेश राणेंनी संजय राऊतांवर केली आहे. (Latest Marathi News)
Edited By - Chandrakant Jagtap
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.