Ganpatipule Mandir News Saam TV
महाराष्ट्र

Ganpatipule Mandir News : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी; गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील दुकाने 31 मेपासून बंद

Ganpatipule Beach News : गणपतीपुळे किनारपट्टी भागात असलेली दुकाने 31 मे पासून बंद करावी लागणार आहेत. गेल्या वर्षी समुद्राला उधाण आले आणि या दुकानांचं नुकसान झालं होतं.

Ruchika Jadhav

पावसाळ्यामध्ये किनारपट्टी भागात अधिक सतर्कता बाळगली जाते. सुरक्षेच्या दृष्टीने वेगवेगळ्या नियमांचे पालन करणं गरजेचं असतं. दरम्यान पावसाळ्यामध्ये समुद्राला उधाण येण्याचे दिवस आणि गेल्या वर्षी गणपतीपुळे या ठिकाणच्या समुद्रकिनारी आलेली लाट, त्यातून उद्भवलेला प्रसंग या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे ग्रामपंचायतने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार, गणपतीपुळे किनारपट्टी भागात असलेली दुकाने 31 मे पासून बंद करावी लागणार आहेत. गेल्या वर्षी समुद्राला उधाण आले आणि या दुकानांचं नुकसान झालं होतं. त्या पार्श्वभूमीवरती हा महत्त्वाचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला असल्याचं मानलं जातं. दरम्यान दरवर्षी दुकाने 10 जूनपर्यंत सुरू असतात. पण यावर्षी मात्र दहा दिवस अगोदरच दुकानं बंद करावी लागणार आहेत.

गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर खाऊसह अन्य विविध दुकाने आहेत. येथे आल्यावर पर्यटक समुद्रात बोटींगचा देखील आनंद लुटतात. मात्र पावसामुळे या सेवा देखील ३१ पासून बंद राहणार आहेत.

कोकणात मान्सूनचं आगमन १० जूनपर्यंत होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर मासेमारीवर आता बंदी घालण्यात आली आहे. सांगली, सोलापूर, धाराशिव, मध्य महाराष्ट्र आणि खान्देशमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी देखील लावली आहे.

मुंबईसह ठाणे आणि अन्य उपनगरांमध्ये देखील पाऊस बरसत आहे. वादळी वाऱ्यासह पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावलीये. पावसामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली आहे, घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे सतर्कतेचा इशारा म्हणून समुद्र किनारपट्टीवरील सर्व भागांना दुकाने बंद करण्यात सांगण्यात आले आहेत.

मुंबईत आजही मुसळधार पावसाच्या सरी

हवामान विभागाने आज मुंबई आणि उपनगरात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवलाय. मुंबईत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Night Skin Care: झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा किचनमधील 'या' गोष्टी; सकाळी मोत्याप्रमाणे चमकेल चेहरा

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

Sambhajinagar News : मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडे माहिती सादर न करणाऱ्या ३३ मुख्याध्यापकांचे निलंबन

Ashton Agar: वाघाचं काळीज लागतं! दुखापतग्रस्त असूनही पठ्ठ्या मैदानात आला अन् एका हाताने केली फलंदाजी -VIDEO

SCROLL FOR NEXT