Digital Payment
Digital PaymentSaam Tv

चुकीच्या UPI ID वर पैसे ट्रान्सफर झालेत? टेन्शन नका घेऊ; या स्टेप्स फॉलो करा, मिनिटात पैसे येतील परत

Wrong UPI ID Problems: अनेकदा चुकीच्या यूपीआय आयडीवर पैसे जातात. जर चुकीच्या यूपीआय आयडीवर पैसे गेले तर काय करावे? ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या.
Published on
Summary

ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करताना अडचणी आल्या

चुकीच्या UPI आयडीवर पैसे गेले

या स्टेप्स फॉलो करुन परत मिळवा पैसे

सध्या सर्वकाही डिजिटल झाले आहे. सर्वजण यूपीआयद्वारे ऑनलाइन पेमेंट करतात. दरम्यान, ऑनलाइन पेमेंट करताना नेहमी सावधगिरी बाळगायची असते. एका लहानश्या चुकीमुळे तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात. अनेकदा तुमचे पैसे चुकीच्या यूपीआय आयडीवर पाठवले जातात. यामुळे पैसे कोणत्या तरी दुसऱ्याच व्यक्तीच्या अकाउंटवर जमा केले जातात. यामुळे अनेक प्रॉब्लेम येऊ शकतात. तुमचे पैसे भलत्याच व्यक्तीला मिळतील. दरम्यान, यावर तोडगा निघाला आहे.

Digital Payment
Digital Payment Tips: दुसऱ्याच्या UPI खात्यावर पैसे ट्रान्सफर झाले? मग परत तुमच्या खात्यात पैसा कसा येणार?

चुकीच्या यूपीआय आयडीवर पैसे गेले असतील तर काय कराल?

जर तुम्ही चुकीच्या यूपीआय आयडीवर पेमेंट केले असेल तर तुम्हाला पैसे मिळू शकतात. त्यासाठी फक्त सिंपल प्रोसेस फॉलो करायची असते. तुमचे यूपीआय ट्रान्झॅक्शन ट्रेस करु शकतात. प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी एक युनिक आयडी असतो. याआधारे बँक चौकशी करते.

सर्वात आधी ट्रान्झॅक्शनची डिटेल्स चेक करा. त्याची तारीख आणि वेळ लक्षात ठेवा. याचसोबत पाठवलेली रक्कम, रिसीवरचे नाव आणि यूपीआय आयडी हे सर्व लक्षात ठेवा. तुमचे पैसे खरंच चुकीच्या खात्यात गेलेत का हे चेक करा. यानंतर यूपीआय अॅपमध्ये तक्रार हा ऑप्शन निवडा. ट्रान्झॅक्शन हिस्ट्री ओपन करा. यानंतर Wrong UPI ID किंवा Sent to wrong person ऑप्शन निवडा.

यानंतर तुमची तक्रार रजिस्टर केली जाईल. यानंतर बँकेला संपर्क करा. कस्टमर केअर किंवा जवळच्या बँकेत जाऊन चौकशी करा. यानंतर सर्व माहिती द्या.

Digital Payment
UPI New Feature VPA: पैसे ट्रान्सफर होतील झटपट; अकाउंट नंबर नसला तरी पाठवता येणार पैसे

बँक रिसीवरला संपर्क करेल. यानंतर त्यांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगेल. तुम्ही स्वतः रिसिवरशी बोलून घ्या.यानंतर त्यांना पैसे पाठवण्याची विनवणी करा.अनेकदा पैसे मिळतात परंतु अनेकदा रिसीवर पैसे द्यायला नकार देतात. यासाठी तुम्ही पुढे तक्रार करु शकतात.

पैसे कधीपर्यंत परत मिळतात?

पैसे परत येण्यासाठी कोणताही वेळ निश्चित नसतो. जर रिसीवरच्या मनात असेल तर काही दिवसात पैसे पाठवतील. कधकधी २-४ आठवड्यात पैसे जमा होऊ शकतात.

Digital Payment
January Bank Holiday: जानेवारीत बँकात १६ दिवस राहणार बंद; RBI ने जारी केली सुट्ट्यांची यादी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com