

बँक खातेधारकाचे नाव, अकाउंट नंबर किंवा IFSC कोडची माहिती न घेता पैसे पाठवून शकतात.
UPI ने VPA किंवा व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस नावाची एक नवीन सुविधा सुरू केलीय.
वेगवेगळ्या यूपीआय अॅप्समध्ये एकाच बँक खात्यासाठी अनेक VPA तयार करू शकतात.
UPI किंवा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसने आपण काही मिनिटांत पैसे ट्रान्सफर करू शकतो. आता ही सेवा अधिक जलद आणि सोपी होणार आहे. UPI ने VPA किंवा व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस नावाची एक नवीन सुविधा सुरू केली आहे. यामुळे डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित आणि जलद होणार आहे
UPI मध्ये VPA किंवा व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस नावाची एक नवीन सुविधा आणण्यात आलीय. VPA सह तुम्ही बँक खात्याची माहिती शेअर न करता पैसे ट्रान्सफर करू शकतात. व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेसच्या फीचरमुळे तुम्हाला बँक खातेधारकाचे नाव, अकाउंट नंबर किंवा IFSC कोडची माहिती न घेता पैसे पाठवून किंवा प्राप्त करू शकतात. विशेष म्हणजे तुम्ही Paytm, PhonePe किंवा Google Payसारख्या वेगवेगळ्या यूपीआय अॅप्समध्ये एकाच बँक खात्यासाठी अनेक VPA तयार करू शकतात.
पेटीएम, फोनपे, गुगल पे यासारखे यूपीआय अॅप डाउनलोड करा.
अॅपमध्ये तुमचा रजिस्टर्ड मोबाइल नंबर टाका त्यात तुमचे बँक अकाउंट लिंक करून घ्या.
तुम्हाला UPI ID तयार करण्यास आणि व्यवहारांसाठी UPI PIN सेट करण्याची सूचना मिळेल.
VPA तयार झाला की तुम्ही पैसे पाठवू किंवा मिळवू शकतात.
यासह तुम्ही इतरांचे VPA वापरून त्यांना पैसे पाठवू शकता. तुम्हाला हवे असेल तुम्ही नंतर तुमचा व्हर्च्युअल पेमेंट पत्ता देखील एडिट करू शकतात आणि बदलू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.