Unseasonal Rains : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने ५४ हजार हेक्टर क्षेत्राला फटका; प्रशासनाकडून प्राथमिक अहवाल

Parbhani News : संबंधित शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश
Parbhani Unseasonal Rains
Parbhani Unseasonal RainsSaam tv
Published On

परभणी : मागील तीन दिवस राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे पिकांना फटका बसला असून (Farmer) शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यात परभणी (Parbhani) जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे सुमारे ५४ हजार हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. तसा प्राथमिक अहवाल प्रशासनाकडून समोर आला आहे. (Latest Marathi News)

Parbhani Unseasonal Rains
Jayant Patil News: सरकार घोषणा करतं पण मदत मिळत नाही; जयंत पाटील यांचा सरकारवर निशाणा

हवामान विभागासह परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण मौसम सेवा विभागाने जिल्ह्यासह मराठवाड्यात चार ते पाच दिवस मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार परभणी जिल्ह्यात २७ व २८ नोव्हेंबरला झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने (Rain) खरीप हंगामातील कापूस, तूर व रबी हंगामातील ज्वारी, हरभरा या चार पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात ५३ हजार ९७६ हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Parbhani Unseasonal Rains
Vaibhav Naik : आमदार नाईकांच्या निगडित संस्थांना एसीबीची नोटीस

तातडीने पंचनामे करण्याचे आदेश 

शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी पुरता कोलमडला आहे. या नुकसानीनंतर शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. संबंधित शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे तातडीने  पंचनामे करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागाला दिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com