Vaibhav Naik : आमदार नाईकांच्या निगडित संस्थांना एसीबीची नोटीस

Shindhadurg News : रत्नागिरीच्या एसीबीकडून कुडाळ- मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेची चौकशी सुरु आहे
Vaibhav Naik
Vaibhav NaikSaam tv
Published On

विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय (एसीबी) कडून उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्याशी निगडित असलेल्या संस्थांना (ACB) एसीबीची नोटीस बजावण्यात आली आहे. यात ५ डिसेंबरसह चौकशीला हजार राहण्याचे आदेश या नोटिशीद्वारे दिले आहे. (Breaking Marathi News)

Vaibhav Naik
Chandrashekhar Bawankule News: राज्यात महायुतीचे ४५ खासदार निवडून येतील : चंद्रशेखर बावनकुळे

रत्नागिरीच्या एसीबीकडून कुडाळ- मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेची चौकशी सुरु आहे. नाईक यांच्या व्यवसायाशी निगडित असलेल्या अजून काही संस्थांना नोटीसा बजावण्यात येणार आहे. यात उघड चौकशीचा भाग म्हणून कणकवली येथील युवक कल्याण ग्रामीण बिगर शेती पतसंस्था कणकवलीच्या शाखा व्यवस्थापकांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे आमदार वैभव नाईक यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Vaibhav Naik
Jayant Patil News: सरकार घोषणा करतं पण मदत मिळत नाही; जयंत पाटील यांचा सरकारवर निशाणा

५ डिसेंबरला चौकशीला हजर राहण्याचे आदेश.
एसीबीने दिलेल्या नोटिशीत म्हटले आहे कि, युवक कल्याण ग्रामीण बिगर शेती पतसंस्था कणकवलीच्या पतसंस्थेची संपूर्ण माहितीसह  ५ डिसेंबरला रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीला हजर राहण्याचे आदेश पतसंस्थेच्या शाखा अधिकाऱ्याला देण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com