Chandrashekhar Bawankule News: राज्यात महायुतीचे ४५ खासदार निवडून येतील : चंद्रशेखर बावनकुळे

Jalgaon News : भाषणातून पाचोरा-भडगाव विधानसभेत गेल्या वर्षी अपक्ष निवडणूक लढलेले अमोल शिंदे यांना अप्रत्यक्षपणे तयारीला लागण्याचे संकेत देण्याचा प्रयत्न
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSaam tv
Published On

भडगाव (जळगाव) : मोदींना हरविण्यासाठी तब्बल २८ पक्ष एकत्र आले आहेत. मात्र, जनता मोदींच्या पाठीशी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचंड (Jalgaon) पाठिंबा मिळत आहे. त्या पाठिंब्याच्या जोरावरच राज्यात महायुतीचे ४८ पैकी ४५ खासदार लोकसभेत निवडून येतील; असा विश्‍वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केला. (Live Marathi News)

Chandrashekhar Bawankule
Ration Shop : १ जानेवारीपासून स्वस्त धान्य वाटप बंद; स्वस्त धान्य दुकानदार महासंघाने या कारणाने घेतला निर्णय

जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे ‘संपर्क से समर्थन’ या अभियानानिमित्त आयोजित कॉर्नर सभेत चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. भाजपचे महामंत्री विजय चौधरी, खासदार उन्मेश पाटील, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा स्मिता वाघ, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर आदी उपस्थित होते. (BJP) प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भाषणातून पाचोरा-भडगाव विधानसभेत गेल्या वर्षी अपक्ष निवडणूक लढलेले अमोल शिंदे यांना अप्रत्यक्षपणे तयारीला लागण्याचे संकेत देण्याचा प्रयत्न केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chandrashekhar Bawankule
Maval Crime: मावळमधील सक्रिय पाच गॅंगवर मोक्का अंतर्गत कारवाई; मागील तीन महिन्यात झाले ४ खून

४५ हजार लोकांना मी भेटलो. त्यापैकी केवळ १६ लोकच भाजपच्या विरोधात आहेत. मोदींना हरविण्यासाठी तब्बल २८ पक्ष एकत्र आले आहेत. मात्र, जनता (Narendra Modi) मोदींच्या पाठीशी आहे. त्यांचे हात बळकट करण्यासाठी आगामी लोकसभेत भाजपला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगाव जिल्हा हा कायम मोदींच्या पाठीशी असल्याने भाजपचा खासदार विक्रमी मतांनी निवडून येईल, असे सांगितले. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com