Ration Shop
Ration ShopSaam tv

Ration Shop : १ जानेवारीपासून स्वस्त धान्य वाटप बंद; स्वस्त धान्य दुकानदार महासंघाने या कारणाने घेतला निर्णय

Buldhana News : जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या, अडचणी समस्यांबाबत एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे
Published on

संजय जाधव 

बुलढाणा : स्वस्त धान्य दुकानदारांच्या काही मागण्या आहेत. ज्या सरकारपुढे ठेवल्या आहेत. परंतु यावर (Buldhana) अद्याप निर्णय होत नसल्याने स्वस्त धान्य दुकानदार महासंघाने रेशन (Ration) वाटप बंद करण्याचा इशारा दिला आहे. ही वाटप नवीन वर्षात अर्थात १ जानेवारीपासून केली जाणार आहे. (Latest Marathi News)

Ration Shop
Sanjay Raut: मला देखील वाटतं अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत; संजय राऊतांचं खोचक वक्तव्य

ऑल इंडिया फेयर प्राईस डीलर फेडरेशन तसेच अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधारक महासंघाच्यावतीने (Ration Shop) आंदोलन छेडले आहे. १ डिसेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या, अडचणी समस्यांबाबत एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यानंतरही निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा महासंघाने दिला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ration Shop
Gas Cylinder Theft: सिलेंडर टाक्यांची चोरी करुन विक्री; दोन जणांना मुद्देमालासह अटक

दरम्यान ऑल इंडिया फेयर प्राईस ऑफ डीलर फेडरेशनच्या वतीने देशभरातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार १ जानेवारीपासून राज्यासह देशभरात स्वस्त धान्याचे वाटप करणार नाही. जोपर्यंत आपल्या मागण्यांच्या संदर्भात सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करत नाही, तोपर्यंत राज्यातील व देशातील स्वस्त धान्य दुकाने बंद राहतील. अस राज्याचे स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे उपाध्यक्ष राजेश अंबुस्कर म्हटल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com