Sanjay Raut: मला देखील वाटतं अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत; संजय राऊतांचं खोचक वक्तव्य

Sanjay Raut On Ajit Pawar: ३१ डिसेंबरनंतर मुख्यमंत्री पदाची जागा खाली होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आम्ही स्वागत करू असं खासदार संजय राऊतांनी म्हटलं आहे.
Sanjay Raut on Ajit Pawar
Sanjay Raut on Ajit Pawar Saam TV
Published On

Political News:

राज्यात मुख्यमंत्री पदासाठी सुरू असलेली शर्यत अद्याप थांबलेली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. अशात यावरून संजय राऊतांनी 'मला देखील अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं', असं खोचक वक्तव्य केलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sanjay Raut on Ajit Pawar
Sanjay Raut News : 'धर्मवीर' सिनेमाचे निर्माते, कलाकारांवर कारवाई करणार का? दत्ता दळवी यांच्या अटकेवर संजय राऊत यांचा संतप्त सवाल

"प्रत्येकालाच वाटतं की मुख्यमंत्री व्हावं. मला ही वाटतं अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळावी. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णय घेतील. ३१ डिसेंबरनंतर मुख्यमंत्री पदाची जागा खाली होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आम्ही स्वागत करू असं खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) म्हटलं आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी सध्या पोलिसांच्या अटकेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत अक्षेपार्ह शब्द वापरल्याच्या आरोपावरून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यावरून त्यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केलाय.

राज्यात दोन कायदे आहेत का?

राज्यात दोन कायदे आहेत का? ज्या शब्दांवरून दत्ता दळवींवर कारवाई करण्यात आली तो शब्द याआधी आनंद दिघेंवरील चित्रपटातही वापरला होता. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याविषयी जी वक्तव्ये केली ती देखील चुकीची होती. मग त्यांच्यावर काय कारवाई झाली? त्यांच्यासाठी वेगळी कारवाई आणि आमच्यासाठी वेगळी असं का? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.

दत्ता दळवींच्या जामिनाला उशिर का?

दत्ता दळवींना लवकरच जामीन मिळाला असता. मात्र जामिनासाठी पोलिसांवर दबाव असल्याने उशिर होत आहे. या प्रकरणाला जास्तीत जास्त वेळ लावा असं सत्ताधाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं आहे. त्यामुळे जामीन मिळण्यास उशिर होतेय. पण तुरुंगात गेल्यामुळे आम्ही तुटणार नाही, असं ठामपणे संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना म्हटलंय.

Sanjay Raut on Ajit Pawar
Dombivli Crime News: हाय प्रोफाइल सोसायटीत अमली पदार्थांची विक्री... दोन सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com