शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना पोलिसांनी अटक केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भर सभेतून शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली दळवी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र या कारवाईवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिला आहे. यावेळी त्यांनी धर्मवीर सिनेमातील आनंद दिघे यांच्या संवादाचा दाखला देत दत्ता दळवी यांच्यावरील कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहे.
दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना एक शब्द वापरला. मात्र हाच शब्द धर्मवीर सिनेमात आनंद दिघे यांच्या तोंडी आहे. तो सेन्सॉर बोर्डने काढला नाही. त्या चित्रपटात आमच्या आनंद दिघे यांच्या तोंडी असलेला शब्द सेन्सॉर बोर्डने कापलेला नाही. जर तो शब्द आक्षेपार्ह असेल तर चित्रपटाचे निर्माते, चित्रपटाचे प्रायोजक, चित्रपटाचे कलाकार यांच्यावर गुन्हा दाखल करणार का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मात्र तोच शब्द दत्ता दळवी यांनी वापरला म्हणून त्यांना अटक कशी केली जाते. काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी भांडूपमधील सभेतून माझ्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती, त्यांच्यावर कारवाई केली का? मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अपशब्द वापरले होते, त्यांच्यावर कारवाई केली का? असा सवाल संजय राऊत यांनी सरकारला विचारला आहे.
राज्यात अवकाळी पाऊस आणि त्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. मात्र आपले मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री प्रचारात व्यक्त आहे. राज्यातील शेतकरी संकटात असताना राज्यकर्ते बाहेर असल्याने त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. यावरुन लक्ष हटवण्यासाठी ही कारवाई केली असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. आम्ही सर्व दत्ता दळवी यांच्या पाठिशी आहोत. आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याचं देखील आम्ही समर्थन करतो, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.