Parbhani News: न्यायालयात अर्धा तास उशिराने पोहोचले पोलीस; न्यायाधीशांनी सुनावली गवत काढण्याची शिक्षा

Judge Punishment: मानवत पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अर्ध्या तास उशिराने न्यायालयात अहवाल घेऊन दाखल झाल्याने कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने सुनावलेल्या या शिक्षेची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
Parbhani News
Parbhani NewsSaam TV
Published On

Manwath News:

कोणतही काम वेळेत पूर्ण होणं गरजेचं असतं. मात्र अनेक व्यक्ती वेळेच्या मर्यादा पाळत नाहीत. न्यायालयीन कामकाजात दिरंगाई झाल्यास मोठ्या घटना घडू शकतात. अशात मानवत पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अर्धा तास उशिराने न्यायालयात अहवाल घेऊन दाखल झाल्याने कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने सुनावलेल्या या शिक्षेची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Parbhani News
Viral Video: एकाच पोरीवर दोघांचा जडला जीव अन् झाला राडा ! तरूणांची भररस्त्यात तुफान हाणामारी; VIDEO व्हायरल

मानवत येथील न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पोलीस (Police) कर्मचाऱ्यांना न्यायालय (Court) परिसरातील गवत काढण्याची शिक्षा ठोठावली आहे. रात्री गस्तीवर असल्याने या कर्मचाऱ्यांना न्यायालयात येण्यास अर्धा तास उशिर झाला होता. पोलिसांना पकडलेल्या संशयीतांना 24 तासाच्या आत न्यायालयात हजर करण्याचा नियम आहे. सुट्टीचा दिवस असल्याने पोलिसांनी न्यायालयाचा वेळ घेतला होता.

परंतु रात्रीच्या गस्तीवर असल्याने कर्मचाऱ्यांना न्यायालयात येण्यास अर्धा तास उशिर झाला. त्यामुळे न्यायाधीशांनी पोलीस कर्मचऱ्यांना गवत काढण्याची शिक्षा दिली आहे. यासाठी न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी पोलीस कर्मचऱ्यांना गवत काढण्यासाठी विळा आणून दिला. त्यानंतर पोलिसांनी न्यायाधीशांनी ठोठावलेली शिक्षा देखील भोगली आहे.

ही घटना 22 ऑक्टोबरची असून या प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक आर रागसुधा यांनी वरीष्ठ उच्च न्यायाल्यातील न्यायाधीशांना याबाबत पत्र दिले आहे. न्यायालयीन कामात वेळेसह नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागते. नियंमांचे उल्लंघन करणे गैर आहे. असे असले तरी पोलीस अधिक्षक आर रागसुधा यांनी घटनेबाबत बरीष्ठ उच्च न्यायालयास पत्र लिहिले आहे.

Parbhani News
Nashik Crime News: रेल्वे प्रवाशांची बॅग चाेरणारा अटकेत, नाशिक गुन्हे शाखा युनिट- १ ची कामगिरी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com