youth held in bag lifting case by nashik police
youth held in bag lifting case by nashik policesaam tv

Nashik Crime News: रेल्वे प्रवाशांची बॅग चाेरणारा अटकेत, नाशिक गुन्हे शाखा युनिट- १ ची कामगिरी

सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत पाेलीसांनी संशयितास शाेधून काढले.

- तबरेज शेख

Nashik News :

रेल्वे प्रवासात प्रवाशांची बॅग चाेरणा-यास सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत शाेधण्यात नाशिक पाेलीस दलास यश आले आहे. या संशयितास गुन्हे शाखा युनिट- १ च्या पथकाने जेरबंद केल्याची माहिती पाेलीस दलाने दिली. (Maharashtra News)

रेल्वे प्रवासात प्रवाशांची बॅग लिफ्टिंगची घटना 25 नाेव्हेंबरला नाशिक रोड रेल्वे स्थानकावर घडली होती. सीसीटीव्ही फुटेजचा आधारे गुन्हे शोध पथकाने अतिशय शिताफिने नाशिक शहरातून संशयितास मुद्देमालसह ताब्यात घेतले.

youth held in bag lifting case by nashik police
Shetkari Samvad Yatra: शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी किसान काँग्रेसचा 'एल्गार', ४ डिसेंबरपासून नंदुरबार ते नागपूर शेतकरी संवाद यात्रा

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार 25 नाेव्हेंबरला मेरी अल्वा (रा. मुंबई) या महिला भोपाळ येथुन मुंबई येथे राणी कमलापती रेल्वेने (बोगी नं. ६) जात असतांना पहाटेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांची शोल्डर पर्स व त्यामध्ये १४ तोळे सोन्याचे दागिने व एक रिअल कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल चोरीन नेला होता.

नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. त्यानंतर पाेलीसांनी संशयितांचा तपास सुरु केला. नाशिक पाेलीस दलाच्या गुन्हे शाखा युनिट- १ च्या पथकाने एकास ताब्यात घेतले. या संशयिताकडे अधिक चाैकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पाेलीसांनी संशियताकडून मुद्देमाल हस्तगत केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

youth held in bag lifting case by nashik police
Social Media त एक मेसेज आला अन् कांद्याचा भाव गडगडला, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी हतबल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com