सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल ४९ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. यंत्रणांनी दिलेल्या पावसाच्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात विक्रीसाठी आणला आहे. (Maharashtra News)
सोशल माध्यमावर मोठ्या प्रमाणात आवक झाल्याचा दावा करत बाजारात व्यापाऱ्यांनी कांद्याचे भाव पाडले. या एकूण परिस्थितीमुळे राज्याच्या तुलनेने सोलापुरातच कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे.
सोलापूर बाजार समितीमध्ये या हंगामातील कांद्याची विक्रमी आवक झाली आहे. मोठ्या प्रमाणात बाजारात कांदा विक्री झाल्याने सर्वत्र कांदाच दिसत होता. विक्रीला आलेल्या कांद्यामध्ये लाल कांद्याचे प्रमाण जास्त आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
लिलावाच्या अगोदर बाजार समितीच्या परिसरातील व्यापाऱ्यांच्या सोशल मीडियावर ५०० ट्रकपेक्षा जास्त आवक झाल्याचा मेसेज व्हायरल करण्यात आला. परिणामी कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी साखळी करत कांद्याचे भाव पाडले. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना उघड्या डोळ्यांनी बाजारातील ही लूट पाहावी लागली.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.