parbhani news, gangakhed news saam tv
महाराष्ट्र

Parbhani News : सामूहिक कार्यक्रमात मांसाहारावर मारला ताव अन्... अवघ्या काही वेळात 13 जणांना रुग्णालयात न्यावं लागलं

सर्व 13 जणांची प्रकृती स्थिर आहे असल्याची माहिती मिळत आहे.

राजेश काटकर

Gangakhed News : परभणी (parbhani) जिल्ह्यात मांसाहर जेवण केल्यानंतर सुमारे तेरा जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली. यामुळे तातडीने विषबाधा झालेल्या नागरिकांना रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. (Maharashtra News)

ही घटना परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील दगडवाडी येथे घडली. या ठिकाणी सामूहिक जेवणातून 13 जणांना विषबाधा झाल्याने बुधवारी दुपारी एकच गाेंधळ उडाला. यावेळी नागरिकांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

याबाबत मिळालेली माहिती अशी : सर्व 13 जणांना मांसाहार खाल्ल्यानंतर त्यांना पोटदुखी, मळमळ, उलटी, चक्कर येण्यास सुरुवात झाली. ही लक्षणे झाल्यानंतर सर्वांना प्रथम उपचारासाठी गंगाखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात (gangakhed hospital) दाखल करण्यात आले होते. या सर्व 13 जणांची प्रकृती स्थिर आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

US-Iran War: अमेरिकेचे इराणवर 7 तास बॉम्ब हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका

Thursday Horoscope: खर्चावर नियंत्रण ठेवा, 5 राशींच्या व्यक्तींच्या व्यवसायात होणार भरभराट ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Healthy Food : ब्राऊन की व्हाईट, कोणता ब्रेड शरीराला हानिकारक? वेळीच सावध व्हा नाहीतर...

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

SCROLL FOR NEXT