Latur Saam
महाराष्ट्र

Latur Crime: भर रस्त्यात २ टोळक्यांमध्ये राडा, फिल्मी स्टाईल हाणामारी; लोखंडी रॉडनं फोडलं, नंतर दगडानं ठेचलं

Gang Clash in Latur Video Viral: लातूरच्या अंबाजोगाई रोड परिसरात एका हॉटेलमध्ये दोन मित्रांच्या टोळीमध्ये तुफान राडा झाला. या राड्यात एकाला लोखंडी रॉडनं मारहाण नंतर दगडानं ठेचलं.

Bhagyashree Kamble

राज्यात मारहाण प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. लातूरमध्ये मित्रांच्या दोन टोळीमध्ये तुफान राडा झाला आहे. हा राडा आधी हॉटेलमध्ये झाला नंतर हॉटेलमधून बाहेर येत हा राडा भररस्त्यात सुरू झाला. या राड्यात एका तरूणाला लोखंडी रॉडने वार केले आहे आणि त्याला दगडाने ठेचलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी ७ जणांवर कारवाई करत ४ जणांना ताब्यात घेत त्यांची धिंड काढली आहे.

लातूरच्या अंबाजोगाई रोड परिसरात एका हॉटेलमध्ये दोन मित्रांच्या टोळीमध्ये तुफान राडा झाला. हॉटेलमध्ये राडा झाल्यानंतर ही टोळी बाहेर रस्त्यावर गेली. भररस्त्यावर तुफान राडा झाला. एका तरूणाला लोखंडी रॉडनं आणि दगडानं मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मारहाणीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल झाला.

या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला. तसेच ७ जणांवर गुन्हा दाखल केला आणि चार जणांना ताब्यात घेतलं आहे. तसेच यातील चार आरोपींची पोलिसांनी धिंड काढली आहे. ताब्यात घेतल्यानंतर आरोपींनी न्यायालयात नेण्यात आलं. ३ आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर एकाची बाल सुधारगृहात रवानगी केली आहे.

आरोपींची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे. यातील ६ आरोपींवर या आधी देखील गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी ४ जणांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, ३ जण अद्याप फरार आहे. फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आंदोलक विद्यार्थ्यांवर देशाला गर्व आहे - राहुल गांधी

Pune : पुण्यातील पेठाही आता FDA च्या रडारावर, अनेक मिठाईच्या दुकानावर छापा; ५ हॉटेलचे परवाने रद्द

Political News :"राहुल गांधी हे २४ तास ड्रग्सच्या नशेत असतात" भाजप आमदारावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Pune Dogs: पुणे पालिकेचा गजब कारभार! भटक्या कुत्र्यांची होणार गणना; 25 लाखांचा खर्च करणार

कुर्ती, ड्रेस आणि साड्यांवर सुंदर दिसतील शॉर्ट मंगळसूत्र, लेटेस्ट, ट्रेंडी 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT