Nitin Gadkari  Saam Tv
महाराष्ट्र

Nitin Gadkari: "शिवाजी महाराज १०० टक्के सेक्युलर, त्यांनी अफझल खानाची कबर.." गडकरींचा भाजप नेत्याला घरचा आहेर

Shivaji Maharaj Was 100% Secular: "छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक लढया लढल्या आहेत. परंतु त्यांनी कधी मशिदीवर हल्ला केलेला नाही", असं नितीन गडकरी म्हणालेत.

Bhagyashree Kamble

"छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर नव्हते", असं वक्तव्य मंत्री नीतेश राणेंनी केलं होतं. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून अनेकांनी त्यांना निशाण्यावर धरलं.

राणेंनी केलेल्या दाव्याला छेद देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आपली भूमिका मांडली आहे. "शिवाजी महाराज हे १०० टक्के सेक्युलर होते", असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी स्पष्ट केलं आहे. तसेच "राजेंनी कधी मशिदीवर हल्ला केलेला नाही", असंही नितीन गडकरी म्हणाले आहेत.

"राजे १०० टक्के सेक्युलर"

कादंबरीकार विश्वास पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर २ इंग्रजी कांदबरी लिहिल्या आहेत. या पुस्तकांचं प्रकाशन सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिल्लीत पार पडला. या सोहळ्यावेळी नितीन गडकरी म्हणाले, "आजकाल सेक्युलर हा शब्द फार प्रचलित आहे. सेक्युलर शब्दाचा इंग्रजी डिक्शनरीमध्ये अर्थ धर्मनिरपेक्षता असा होत नाही. सेक्युलर शब्दाचा अर्थ सर्वधर्मसमभाव असा होतो. म्हणजेच सगळ्या धर्मांसोबत समान न्याय करणे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या इतिहासातील असे राजे होते, जे १०० टक्के सेक्युलर होते", असं नितीन गडकरी म्हणालेत.

"अफझल खानाची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी"

"छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक लढया लढल्या आहेत. परंतु, त्यांनी कधी मशिदीवर हल्ला केलेला नाही. ज्या अफझल खानानं छत्रपती शिवाजी महाराजांवर वार केले होते, त्याच्यावर देखील महाराजांनी वार केला. त्यावेळी अफझल खानचा मृत्यू झाला. खानाच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खान याची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधा, असे आदेश दिले होते", असं नितीन गडकरी म्हणालेत.

"जात पात धर्म पंथ याने व्यक्ती मोठा होत नाही"

"जात पात धर्म पंथ याने व्यक्ती मोठा होत नाही. तर, तो पराक्रमाने मोठा होतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात काही मुस्लिम सैनिक देखील होते. शिवाजी महाराज यांचं कार्य फक्त महाराष्ट्र पुरते मर्यादित न राहता, जगभर जायला हवं, अशी अपेक्षाही नितीन गडकरी यांनी बोलून दाखवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT