GADCHIROLI DRUG BUST saam tv
महाराष्ट्र

छत्तीसगड ते बीड ड्रग्ज कनेक्शन! गडचिरोलीत १.४६ कोटींचा अंमली पदार्थ जप्त

Gadchiroli Police Seize 240 Kg Narcotics Worth Rs 1.46 Crore: गडचिरोली पोलिसांची अंमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई! २४० किलो ५८० ग्रॅम अंमली पदार्थांसह १ कोटी ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

गणेश शिंगाडे, साम टीव्ही

गडचिरोली जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अंमली पदार्थांची वाहतूक करून विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या आठ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत तब्बल २४० किलो ५८० ग्रॅम अंमली पदार्थांसह तीन चारचाकी वाहने आणि आठ मोबाईल असा एकूण १ कोटी ४६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस मदत केंद्र गट्टा (फु.) यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

नाकाबंदीदरम्यान तस्करीचा पर्दाफाश उपविभाग पेंढरी अंतर्गत पोलीस मदत केंद्र गट्टा (फु.) हद्दीत पोलिसांकडून नाकाबंदी सुरू होती. यावेळी छत्तीसगड पासिंगच्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनाची तपासणी केली असता त्यातील तिघे जण पोलिसांना संशयास्पद उत्तरे देत असल्याचे आढळले. कसून चौकशी केली असता हे तिघे अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पुढच्या बाजूने पायलटिंग करत असल्याची माहिती समोर आली. त्यांच्या माहितीवरून मागून पिकअप वाहनातून अंमली पदार्थ घेऊन येणाऱ्या अन्य तिघांना, तर निळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून अंमली पदार्थ खरेदी करण्यासाठी आलेल्या बीड जिल्ह्यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अशा प्रकारे छत्तीसगडमधील सहा आणि बीड जिल्ह्यातील दोन अशा एकूण आठ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

१२ गोण्यांमध्ये २४० किलो अंमली पदार्थ

आरोपींची झडती घेतली असता १२ गोण्यांमध्ये भरलेला २४० किलो ५८० ग्रॅम अंमली पदार्थ आढळून आला. त्याची अंदाजे किंमत १ कोटी २० लाख २९ हजार रुपये आहे. तसेच 3 चारचाकी वाहने, आठ मोबाईल असा एकूण १ कोटी ४६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आठही आरोपींविरुद्ध उपपोलीस ठाणे पेंढरी येथे १ नोव्हेंबर रोजी एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या तस्करीमागील मुख्य सूत्रधार आणि अंमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा शोध पोलीस घेत आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा आणि अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल आगलावे, पोलीस मदत केंद्र गट्टाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दयानंद भोंबे आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल आगलावे करीत आहेत. गडचिरोली पोलिसांच्या या मोठ्या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीचे जाळे उघडकीस येण्याची शक्यता असून, या प्रकरणातील पुढील तपासाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fixed Deposit : तुम्हाला एफडी करायचीय? या बँक योजनेतून मिळतोय दमदार परतावा, जाणून संपूर्ण गणित

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर जिल्हा बँकेचा उद्या फैसला! विखे-थोरात विरुद्ध लंके गटाच्या प्रतिष्ठेची लढाई

जिवलग जिवाच्या मित्रालाही सांगू नका तुमच्या आयुष्याच्या या ५ गोष्टी, अन्यथा डोक्याला मारावा लागेल हाथ

काँग्रेसचं लोकशाही संपवण्याचं षडयंत्र; लोकशाही बचाव’ पदयात्रेत मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

Tuesday Horoscope: पैशांची तंगी जाणवणार नाही; या 3 राशींना मिळणार लाभ, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT