कोल्हापूरच्या ड्रग्सचे कनेक्शन थेट चीन, हाँगकाँगपर्यंत; महाराष्ट्रात ९ महिन्यात ६१९ कोटींचं अमली पदार्थ जप्त

Maharashtra Drug Case China Connection: कोल्हापूरच्या चंदगडमधील संशयित एमडी ड्रग्ज निर्मिती प्रकरणाचे धागेदोरे हाँगकाँग आणि चीनपर्यंत पोहोचल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. महाराष्ट्रात नऊ महिन्यांत ६१९ कोटींचे अमली पदार्थ जप्त झाल्याचे वृत्त आहे.
Kolhapur MD drug manufacturing case linked to China and Hong Kong
Kolhapur MD drug manufacturing case linked to China and Hong Kongsaam tv
Published On: 

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील एका पोल्ट्री फार्मवर टाकलेल्या छाप्यामुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र हादरला होता. दुर्गम जंगलात शेती, शेतीपूरक व्यवसायाच्या मागे एम डी ड्रग्ज निर्मितीचा कारखाना सुरू होता, २ महिन्यांपूर्वी ए एन टी एफ ने याठिकाणी छापा टाकत मोठी कारवाई केली होती. मीरा भाईंदर मधील नयानगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचे धागेदोरे आधी कोल्हापूर आणि त्यानंतर थेट हॉंगकॉंग आणि चीन पर्यंत पोहचले असल्याचं तपासातून समोर आले आहे.

याप्रकरणात एकूण २७ जणांना अटक करण्यात आली असून आतापर्यंत १०.६०३ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थांची किंमत तब्बल २३.९५ कोटी रुपये इतकी आहे. मेफेड्रोन या कृत्रिम अंमली पदार्थाचे बेकायदेशीर उत्पादन आणि वितरण करणाऱ्या आंतरराज्यीय नेटवर्कचे धागेदोरे समोर आले असून महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये या नेटवर्कचे संबंध आढळून आले. छापेमारी दरम्यान कारखान्यातून एम डी निर्मितीसाठी वापरले जात असलेले विविध कंटेनर, उपकरणे, वजनकाटे, इलेक्ट्रिक हिटर, मिक्सर यासह इतर इलेक्ट्रॉनिक सामग्री जप्त करण्यात आली होती.

ए एन टी एफ च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रासायनिक पदार्थाची खरेदी, बेकायदेशीर उत्पादन, वाहतूक आणि त्याचे वितरण अशी साखळी तपासात उघड झाली. तपासादरम्यान रासायनिक पुरवठ्याचे धागेदोरे चीन आणि हॉगकॉग पर्यंत पोचल्याचे निष्पन्न झाले आहे. ए एन टी एफ कडून या संशयित रासायनिक पदार्थांचे मूळ खरेदीचे मार्ग आणि त्याचा वापर नेमका कुठे झाला होता याचा तपास सुरू आहे.

राज्यात गेल्या ९ महिन्यात ६१९ कोटी रुपये किंमतीचे तब्बल २७ टन अमली पदार्थ जप्त करण्यात अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ए एन टी एफ) ला यश आले आहे. जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांच्या कालावधीत २९५७ गुन्ह्यांमध्ये १३ हजार आरोपींवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आज ए एन टी एफ च्या विशेष पोलिस महानिरीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी पत्रकार परिषदेतून दिली.

Kolhapur MD drug manufacturing case linked to China and Hong Kong
Mumbai : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! १० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; चेंबूरमधून दोघांना अटक

अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स हे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या अधिपत्याखाली मे २०२५ पासून कार्यरत आहे. अमली पदार्थांची विक्री, पुरवठा आणि वितरण यावर निर्बंध यावेत तसेच अमली पदार्थाच्या सेवनाच्या दुष्परिणामांबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी यासाठी या विभागाची स्थापना करण्यात आली आहे.

Kolhapur MD drug manufacturing case linked to China and Hong Kong
ड्रग्ज तस्कराच्या मुसक्या आवळल्या; मुंबई पोलिसांच्या कारवाईत तब्बल ९ लाखांचा MD जप्त

गेल्या ५ वर्षांमध्ये ए एन टी एफ ने महाराष्ट्रात केलेल्या कारवाईचा आढावा

साल: २०२१

दाखल गुन्हे: १८१५

जप्त केलेले अमली पदार्थ (टन): ४०.०४

जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत: १९१ कोटी रुपये

अटक केलेले आरोपी: १२ हजार १५५

-----

साल: २०२२

दाखल गुन्हे: १८४१

जप्त केलेले अमली पदार्थ (टन): ३९.६४

जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत: ३२९.६४ कोटी

अटक केलेले आरोपी: १४ हजार ४५१

------

साल: २०२३

दाखल गुन्हे: २८३०

जप्त केलेले अमली पदार्थ (टन): ४३.६८

जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत: ८९७ कोटी रुपये

अटक केलेले आरोपी: १६ हजार १०५

-----

साल: २०२४

दाखल गुन्हे: २७३८

जप्त केलेले अमली पदार्थ (टन): ४४

जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत: ४ हजार २३९

अटक केलेले आरोपी: १४ हजार २३०

-----

साल: २०२५

दाखल गुन्हे: ३६५९

जप्त केलेले अमली पदार्थ (टन): ५६.४८

जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत: १३४० कोटी रुपये

अटक केलेले आरोपी: १५ हजार ९९३

-----

साल: २०२६ (सप्टेंबर पर्यंत)

दाखल गुन्हे: २९५७

जप्त केलेले अमली पदार्थ (टन): २७.९१

जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत: ६१९ कोटी रुपये

अटक केलेले आरोपी: १३ हजार ३५५

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com