Gadchiroli Flood Saam tv
महाराष्ट्र

Gadchiroli Flood : वैनगंगा नदीच्या पुरामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली; पुरामुळे चार राष्ट्रीय महामार्ग बंद

Gadchiroli News : गडचिरोलीच्या भामरागड मधील पूरस्थिती तिसऱ्या दिवशीही जैसे थे असून हळूहळू पूर ओसरायला सुरुवात झाली आहे. मात्र दुसरीकडे गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे वैनगंगा नदीने पात्र सोडले आहे

Rajesh Sonwane

महेंद्र भांडेकर 
गडचिरोली
: बिदर्भातील अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान वैनगंगा नदीला देखील मोठा पूर आला असल्याने नदीच्या पुरामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. परिणामी शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर पूरजन्य परिस्थितीमुळे चार राष्ट्रीय महामार्ग बंद झाले आहेत. 

गडचिरोलीच्या (Gadchiroli) भामरागड मधील पूरस्थिती तिसऱ्या दिवशीही जैसे थे असून हळूहळू पूर ओसरायला सुरुवात झाली आहे. मात्र दुसरीकडे गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे वैनगंगा नदीने पात्र सोडले आहे. गोसेखुर्द धरणातून आताही 12 ते 14 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गडचिरोलीतील पूरस्थिती आज दिवसभर कायम राहण्याची शक्यता आहे. नदीला आलेल्या पुरामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. 

चार महामार्ग वाहतुकीस बंद 

वैनगंगा नदीला मोठा पूर असल्याने जिल्ह्यातून गेलेले चार राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. यात गडचिरोली- नागपूर, गडचिरोली-चामोर्शी, आल्लापल्ली-भामरागड या तीन राष्ट्रीय महामार्गसह आरमोरी - रामाळा हा प्रमुख मार्ग बंद झाला आहे.  दरम्यान मंगळवारी दुपारपासून पाऊस थांबला असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यामुळे पूर ओसरल्यास या मार्गांवरील वाहतूक सुरु होण्याची शक्यता आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: लहानपणी होते तसे दाट, लांबसडक आणि चमकदार केस हवेत? मग घरीच करा 'हा' सोपा उपाय

Maharashtra News Live Update: मेळघाटात धक्कादायक प्रकार; दफन केल्यानंतर 23 दिवसांनी मृतदेह काढला बाहेर

मुगाची डाळ टाकून टाकळ्याची भाजी कशी बनवायची? सोपी रेसिपी

Amravati Crime : दफन केलेला तरुणाचा मृतदेह २३ दिवसांनी पुन्हा थडग्याबाहेर काढला; धक्कादायक आलं समोर?

Pune News: उद्यानातील झाडांवर फिरवली कुऱ्हाड, पालिकेचा कर्मचारीच निघाला 'पुष्पा'; लाकडं घेऊन जातानाचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT