Chhattisgarh Latest news  Saam tv
महाराष्ट्र

Naxal Killed in Gadchiroli : गडचिरोलीत नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी कारवाईत केला ४ जणांचा खात्मा

Naxalist Killed in Gadchiroli forest : गडचिरोलीतील जंगलात पोलीस कारवाईत ४ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे. गडचिरोलीत पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Saam Tv

मंगेश भांडेकर, साम टीव्ही प्रतिनिधी

गडचिरोली : गडचिरोलीतून मोठी बातमी हाती आली आहे. गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत ४ जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच या कारवाईत एक सी ६० पथकाचा कमांडो जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडून नक्षलवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोलीत पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. गडचिरोलीतल भामरागड तालुक्यात कोपरीच्या जंगलात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ नक्षलवाद्यांना ठार केले. तर या कारवाईत एक सी 60 पथकाचा कमांडो जखमी झाला आहे. g

गडचिरोलीतील भामरागड तालुक्यात कोपरीच्या जंगलात गेल्या ४ तासांपासून चकमक सुरु आहे. या चकमकीत ४ नक्षलवादी ठार करण्यात यश आलं आहे. गडचिरोलीतील घटनास्थळी आणि अतिदुर्गम घनदाट जंगलाने वेढलेला भाग आहे. या जंगलात पोलिसांकडून कारवाई सुरु आहे.

गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील कोपरी हा शेवटचा जंगल परिसर आहे. याच जंगल भागात चकमक सुरु आहे. कोपरी या जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी लपल्याचा माहिती पोलिसांना मिळाली आहे. याच जंगलात पोलिसांनी ऑपरेशन राबवल. या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी ४ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. घटनास्थळी सी. ६० पोलीस पथकाचे तुकड्या वाढवण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT