Top Maoist leader Bhupati and 61 cadres surrender in Gadchiroli — Maharashtra marks a new chapter in ending Naxalism. saam tv
महाराष्ट्र

Gadchiroli Naxalites: मोठी बातमी! साडेपाच कोटींचं बक्षीस असलेल्या भूपतीसह ६१ नक्षलवाद्यांचं सशस्र आत्मसमर्पण

Gadchiroli Naxalites Surrender: गडचिरोलीत एक ऐतिहासिक घटना घडली आहे. साडेपाच कोटी बक्षीस असलेल्यासह ६१ नक्षलवांद्यांनी आज आत्मसमर्पण केले आहे.

Bharat Jadhav

  • मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक कार्यक्रम पार पडला.

  • गडचिरोलीत साडेपाच कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवादी भूपती आत्मसमर्पण.

  • महाराष्ट्रातील नक्षलवाद संपुष्टात येण्याच्या दिशेने मोठं पाऊल.

केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रयत्नातून माओवादी केंद्रीय समितीच्या अनेक जहाल वरिष्ठांसह एकूण ६१ सदस्यांनी सशस्र आत्मसमर्पण केलं. ही नक्षलवादाच्या समाप्तीची सुरुवात आहे. आता नक्षलवाद १०० टक्के हद्दपार होणार, अशा परिस्थितीत आपण पोहोचलो असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या लढाईचे नेतृत्व गडचिरोली जिल्हा करत आहे, हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा मुद्दा आहे असल्याचाही उल्लेख त्यांनी केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोली येथे साडेपाच कोटींहून अधिक बक्षीस असलेल्या नक्षल चळवळीतील सर्वोच्च नेता भूपती उर्फ मल्लोजुल्ला वेणूगोपालराव याच्यासह माओवादी केंद्रीय समितीच्या दोन डिकेएसझेडसी सदस्य, १० डिव्हीसीएम दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह एकूण ६१ जहाल माओवादी सदस्यांनी सशस्र आत्मसमर्पण केले.

त्यांनी ५४ अग्निशस्त्रांसह आणि नक्षली गणवेशात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केले. या सर्व आत्मसमर्पित माओवाद्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संविधानाची प्रत देऊन लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात स्वागत करण्यात आले.

आत्मसमर्पण आणि नवीन इतिहास

४० वर्षांपूर्वी अहेरी, सिरोंचा या भागात नवीन दलम सुरू करून मावोवाद चळवळ उभी करणाऱ्या भूपतीसारख्या वरिष्ठ माओवादी नेत्याने आज ६१ साथीदारांसह सशस्र आत्मसमर्पण केले आहे. "ही देशाच्या इतिहासातील अत्यंत मोठी घटना आहे," असे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले, आजच्या आत्मसमर्पणातून नवीन इतिहास लिहिल्या गेला आहे. यापूर्वी उत्तर गडचिरोलीतून माओवाद संपुष्टात आणण्यात आला आहे, आणि आजच्या या आत्मसमर्पणामुळे दक्षिण गडचिरोलीतील माओवादही संपुष्टात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते?

Maharashtra Live News Update: कोपरगावात अवकाळी पावसाची हजेरी

हेल्मेटच्या विविध रंगामध्ये लपलंय खास सिक्रेट; वाचा कोणत्या रंगाचा काय अर्थ?

Moon: जगात सर्वप्रथम चंद्र कुठे दिसतो?

संग्राम जगताप म्हणाले हिरव्या सापाला ठेचण्याची वेळ आली, अजित पवारांनी काढले वाभाडे, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT