FSSAI Packaged Food Safety News AI Image
महाराष्ट्र

Packaged Food : FSSAI चा मोठा निर्णय! पॅक बंद फूड आणि ड्रिंक्सवर लावणार लाल षटकोनी चिन्ह; नेमकं काय कारण? वाचा

FSSAI Packaged Food Food Safety Update News : पॅकेज्ड खाद्यपदार्थ आणि पेयांमध्ये जास्त साखर, मीठ किंवा फॅट असल्यास पॅकेजवर लाल षटकोनी अलर्ट करणार चिन्ह देण्याचा FSSAIचा प्रस्ताव आहे. जाणून घ्या नव्या नियमांबद्दल सविस्तर माहिती.

Alisha Khedekar

  • FSSAIचा मोठा प्रस्ताव

  • जास्त साखर, मीठ किंवा फॅट असलेल्या पॅकेज खाद्यपदार्थांवर लाल षटकोनी चिन्ह

  • ग्राहकांना थेट फायदा

  • काही पदार्थांना वगळण्याचा प्रस्ताव

ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता पॅकेज फूड आणि पेयांमध्ये जर जास्त साखर, मीठ आणि फॅट असल्यास तुम्हाला समजणार आहे. त्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता पॅकेज फूड आणि ड्रिंक्समध्ये जास्त साखर,मीठ किंवा फॅट असल्यास त्याच्या पॅकेजिंगवर त्याची माहिती एका लाल षटकोनी (Red Hexagon) चिन्हाद्वारे अधोरेखित केले जाईल. दरम्यान कंपनीने असे न केल्यास होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, FSSAI ने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या पत्रात या प्रस्तावाची माहिती दिली आहे. नव्या नियमांनुसार, संबंधित खाद्यपदार्थांच्या पॅकेजवर ‘HIGH SUGAR’, ‘HIGH SALT’ किंवा ‘HIGH FAT’ अशी स्पष्ट चेतावणी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ही माहिती पॅकेजवरील नियमित पोषणमूल्यांच्या तक्त्यापेक्षा मोठ्या अक्षरात आणि ग्राहकांचे त्वरित लक्ष वेधून घेईल अशा पद्धतीने छापण्याचा प्रस्ताव आहे.

‘3S And Our Health Society’ या संस्थेने खाद्यपदार्थांवर फ्रंट-ऑफ-पॅक चेतावणी लेबल अनिवार्य करण्याची मागणी करत जनहित याचिका दाखल केली आहे. १३ ऑगस्ट रोजीच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने FSSAI ला या विषयावर लवकरात लवकर योग्य निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर FSSAI ने न्यायालयात अनुपालन प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

FSSAI ने हे नियम टप्प्याटप्प्याने लागू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. दरम्यान, प्रत्येक खाद्यपदार्थावर ही चेतावणी लावली जाणार नाही. तूप, खाद्यतेल, मीठ, साखर, गूळ आणि मध यांसारख्या एकाच घटकापासून बनलेल्या आवश्यक पदार्थांना या फ्रंट-ऑफ-पॅक चेतावणीपासून वगळण्याचा प्रस्ताव आहे. नवे नियम लागू झाल्यास ग्राहकांना एखाद्या पॅकेज बंद खाद्यपदार्थात साखर, मीठ किंवा फॅटचे प्रमाण जास्त आहे की नाही, हे खरेदीपूर्वीच सहज समजण्यास मदत होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Facial Hair Removal: शेव्हिंग, वॅक्सिंग की लेझर? चेहऱ्यावरील नको असलेले फेशियल हेअरसाठी कोणता पर्याय आहे सेफ

Maharashtra News Live Update: नवी मुंबईत वाशीतील मिनी शिशोर मध्ये तरुणाची हत्या

डायबिटीजचे रूग्ण केळी खाऊ शकतात का?

Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढलंय? रोज नाश्त्याला खा 'हा' १ पदार्थ, हार्ट अटॅकचा धोकाही टळेल

Dhaba Style Dal Tadka Recipe: घरच्या घरी बनवा ढाबा स्टाइल तूर डाळ तडका, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT