holi, ballons, police saam tv
महाराष्ट्र

Holi Festival of Colours : 'होळी' त रंगाचे फुगे मारल्यास खावी लागणार तुरुंगाची हवा, नागपूरात चार हजार पाेलिस तैनात

होळी, धुळवड साजरी करताना रंग भरलेले फुगे मारले जातात.

संजय डाफ

Holi Festival : होळी (Holi) आणि धुलिवंदनाच्या (dhulivandan) पार्श्‍वभूमीवर कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून नागपूरात (nagpur) पोलिस विभाग ॲक्शन मोडवर आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात ६ ते ८ मार्च कालावधीत ४० ठिकाणी पाेलिसांचा बंदोबस्त राहील अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

होळी, धुळवड साजरी करताना रंग भरलेले फुगे मारले जातात. मात्र, नागपूरात यंदाच्या धुळवडीत रंग भरलेले फुगे फेकून मारल्यास थेट गुन्हा दाखल होणार आहे. नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यासाठी पाेलिसांचा तगडा फाैजफाटा तैनात केला आहे.

शहरात ४००० पोलिसांचा बंदाेबस्त लावण्यात आला आहे. ६० संवेदनशील ठिकाणी पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन राहणार आहे. ड्रंक ॲण्ड ड्राईव्हच्या कारवाया देखील करणार असल्याचे अमितेश कुमार यांनी नमूद केले.

याबराेबरच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुख्य चौकात नाकाबंदी मोहीम राबविणार शाळकरी मुला-मुलींचे वसतिगृह, महिलांच्या वसतिगृहाजवळ पोलीसांचे फिक्स पॉईंट लावून या परिसरात पोलिस गस्त असणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Thursday : ५ राशींच्या वाटेतली विघ्न दूर होणार, स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेणार; वाचा गुरुवारचे खास राशीभविष्य

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर बर्निंग बाईकचा थरार

Pigmentation: चेहऱ्यावरील पिगमेंटेशन कमी करण्यासाठी करा 'हे' उपाय?

आंदोलनादरम्यान गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगेंना सल्ला|VIDEO

Asia Cup : वर्ल्डकप जिंकूच शकत नाही! टीम इंडियाच्या निवडीवर महान खेळाडू भडकला

SCROLL FOR NEXT