Gondia : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील काळ्या बिबट्याची शिकार, पाच अटकेत; 21.50 लाख रुपयांसह वन्यप्राण्यांचे अवयव जप्त
Navegaon Nagzira Tiger Reserve : महाराष्ट्रात काळ्या बिबट्याचे (black leopard) अस्तित्व दुर्मीळ असतानाच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील एकमेव काळ्या बिबट्याची शिकार केल्याची कबुली देवरी तालुक्यातील मंगेझरी येथे अटकेत असलेल्या पाच संशयितांनी दिली. या संशयितांकडून 21.50 लाख रोख रक्कम व वन्यप्राण्यांचे अवयव जप्त (gondia latest marathi news)
संशयितांच्या माहितीच्या आधारे काळ्या बिबट्याचे अर्धवट जळालेले हृदय वनविभागाने जप्त केल्याची माहिती नागझिरा नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पाचे विभागीय वन अधिकारी प्रदीप पाटील यांनी दिली.
गोंदिया जिल्ह्यात (gondia) वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी व विक्री होणार असल्याची खात्रीलायक गुप्त माहिती विशेष व्याघ्र संरक्षण दल व नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांना मिळाली होती. (Maharashtra News)
व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी व पोलिस विभाग, गोंदिया यांना एक महिन्याच्या प्रयत्नानंतर पाच संशयितांना पकडण्यात यश आले. यामध्ये शामलाल ढिवरू मडावी, दिवारू कोल्हारे, माणिक दारसू ताराम, अशोक गोटे, सर्व रा. मंगेझरी, पो. मुरदोली, ता. देवरी व रवींद्र लक्ष्मण बोडगेवार, रा. पालांदूर ता. देवरी या संशयितांनी मंगेझरी येथे 13 जानेवारी रोजी काळ्या बिबट्याला फासात अडकविल्याची कबुली दिली. या पाच जणांकडून आणखी मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.