Raju Shetti Tweet: लबाड लांडगं ढाँग करतंय ! दिवसा वीजेच साँग करतंय !! 'सत्तेत आल्यावर त्यांचीही फ्यूज उडाली'

Swabhimani Shetkari Sanghatana: शेतक-यांच्या प्रश्नांबाबत राजू शेट्टी हे गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाले आहेत.
Raju Shetti
Raju Shettisaam tv
Published On

Raju Shetti News: राज्यातील शेतक-यांच्या (farmers) प्रश्नांकडे लक्ष द्यायला सत्ताधा-यांना वेळ नाही. केवळ बाेलबच्चन गिरी करायची आणि वेळ मारुन न्यायची असा प्रकार सुरु झाला आहे. त्यामुळे “लबाड लांडगं ढोंग करतंय ! दिवसा वीजेच सोंग करतंय !!” असंच म्हणावे लागेल असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ट्विट (Tweet) केले आहे.

राज्य विधीमंडळ अधिवेशना दरम्यान विरोधी पक्ष राज्यातील कांदा, कापूस, सोयाबीन, हरबरा, द्राक्ष उत्पादक शेतकरी यांच्या समस्या, शेत मालाला मिळणारा कवडीमोल दर, कांदा उत्पादक आदी समस्यांवर विरोधी पक्षाने सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावर स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी “सत्तेत आल्यानंतर तीच काठी पहिल्यांदा शेतक-यांच्या पाठीत….!” असे ट्विट करुन सत्ताधा-यांना लक्ष केले हाेते.

Raju Shetti
Karad : सवंगड्याचा बुडून मृत्यू; दहावीतील मित्रांवर शाेककळा

आज शेट्टी यांनी पुन्हा, “शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या” या मागणीच्या अनुषंगाने ट्विट करुन सत्ताधा-यांसह विरोधकांचे लक्ष वेधण्याचे काम केले आहे. शेट्टी यांनी लबाड लांडगं ढोंग करतंय! दिवसा वीजेच सोंग करतंय !! असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महाविकास आघाडी सत्तेत असताना माझ्यासह हजारो शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या या मागणीसाठी कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर १४ दिवस कचरा कुंडाजवळ ठिय्या आंदोलन केले होते.

त्यावेळी सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्यांना दिवसा वीज देण्याची सदबुद्धी का देवाने दिली नाही, तेव्हा यांच्या दिवसा वीजेचा करंट कुठे गेला होता ? आणि आताचे सत्ताधारी तेव्हा शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या म्हणून सभागृहात आमच्या बाजूने थयथयाट करून सत्ताधारी यांना ४४० चा करंट देत होते.

आता मात्र, सत्तेत आल्यावर या प्रश्नाबाबत त्यांचीही फ्यूज उडाली आहे. सत्तेत खुर्ची मिळेपर्यंत विरोधी पक्षच शेतकऱ्यांचा परमनंट सोबती ! असे शेट्टींनी एक छायाचित्र पाेस्ट करुन म्हटलं आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com