Satara : छत्रपतींबद्दल आम्हांला आदर आहे, पण... राजेंच्या बालेकिल्ल्यात काय म्हणाले संजय राऊत, वाचा सविस्तर

खासदार संजय राऊत हे पश्चिम महाराष्ट्राच्या दाै-यावर आले हाेते.
Sanjay Raut, Satara, chhatrapati shivaji maharaj descendants, shivendraraje bhosale, shivgarjana yatra
Sanjay Raut, Satara, chhatrapati shivaji maharaj descendants, shivendraraje bhosale, shivgarjana yatrasaam tv

Sanjay Raut News : महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात शिवगर्जना यात्रेला (shivgarjana yatra) मिळत असलेला प्रतिसादानंतर गद्दारांना गाडण्यासाठी जनता सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. शिवगर्जना असे या यात्रेचे नाव आहे, ही गर्जना आमची नसून जनतेचे आहे. जनतेच्या मनातील चीड आम्ही पाहात आहाेत असे खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी नमूद केले.

शिवगर्जना संपर्क अभियानाच्या निमित्ताने खासदार संजय राऊत हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी साता-यातील शाहू कला मंदिर सभागृहात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

संजय राऊत म्हणाले ४० चोर ज्या पद्धतीने शिवसेनेची बेइमानी करून पळून गेले. त्यांनी पैशाच्या जोरावर शिवसेना आणि धनुष्यबाण विकत घेण्याचा प्रयत्न केला. त्या चोरांच्या विषयी मी म्हटलं आहे. विधिमंडळ पक्ष तोच त्यांनी विधिमंडळ पक्ष फोडला. तो त्यांनी फोडला त्यामुळे विधिमंडळ पक्षाची विधिमंडळाची प्रतिष्ठा खालावली असेही राऊत यांनी नमूद केले. (Maharashtra News)

Sanjay Raut, Satara, chhatrapati shivaji maharaj descendants, shivendraraje bhosale, shivgarjana yatra
Udayanraje Bhosale News: उदयनराजेंना बालेकिल्ल्यात संजय राऊत प्रत्युत्तर देणार ?

वशंजांबद्दल आदर पण...

साता-याच्या आमदारांबद्दल (Shivendraraje Bhosale) आम्हाला आदर आहे पण या भाजपला अजिबात छत्रपतींच्या बद्दल आदर नाही. पूर्वी छत्रपती पेशव्यांच्या नेमणुका करत होते आता पेशवे नेमायला लागले आहेत असे संजय राऊत यांनी म्हटलं. ते म्हणाले छत्रपतींच्या वंशजांनी ज्या प्रकारे तडजोड केली ही कधीच मान्य होणार नाही.

पुढचा मुख्यमंत्री आमचाच

उद्धव ठाकरे यांच्या बिघडलेल्या प्रकृतीचा फायदा घेऊन या पंतने आणि मिंध्याने कट रचून सरकार पाडलं. आता पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री आम्ही बसवून दाखवू असे आत्मविश्वासाने संजय राऊत यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com