former mla rajan patil, ranjitsinh mohite patil, solapur news saam tv
महाराष्ट्र

Solapur Political News : रणजितसिंह माेहिते पाटलांच्या मंत्रिपदासाठी एनसीपीचा नेता टाकणार शब्द

पापरी येथे नागरी सत्कार समारंभात माजी आमदार राजन पाटील हे बाेलत हाेते.

विश्वभूषण लिमये

Solapur Political News : रणजितदादांच्या मंत्रिपदासाठी आम्ही वकिली करू. भाजपमध्येही आमचे ऐकणारे आहेत असे मोठे वक्तव्य एनसीपीचे नेते आणि माजी आमदार राजन पाटील यांनी नुकतेच केले आहे. दरम्यान या वक्तव्यामुळे माजी आमदार राजन पाटील हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा साेलापूर जिल्ह्यात रंगली आहे. (Ranjitsinh Mohite Patil Latest Marathi News)

सोलापूर जिल्हा अगोदर राष्ट्रवादीमय (ncp) होता, तो आता कमी झाला आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना लाल दिव्याची गाडी मिळावी, त्याच्यासाठी आम्ही वकिली करू; कारण भाजपमध्ये (bjp) आमचेही ऐकणारे कोणीतरी आहेत, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी आपले भाजपमधील वजन प्रवेशाआधीच अधोरेखित केले. (Maharashtra News)

वैमानिक झाल्याबद्दल ऋतुजा राजन पाटील, रयत शिक्षण संस्थेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल डॉ. बाबासाहेब देशमुख, अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अजिंक्यराणा पाटील या तिघांचा पापरी ग्रामस्थ, ग्रामपंचायत पापरी व भोसले कुटुंबीय यांच्या वतीने पापरी येथे नागरी सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमात माजी आमदार राजन पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थावरून बोलत हेाते.

माजी आमदार राजन पाटील हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा हाेती व आता पुन्हा एकदा हाेऊ लागली आहे. रणजितदादांच्या मंत्रिपदासाठी वकिली करू असे वक्तव्य त्यांनी केल्याने भाजपात आपले वजन असल्याचे त्यांनी पक्ष प्रवेशापुर्वीच सांगून टाकल्याची चर्चा रंगली आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; मतदान प्रक्रियेला सुरुवात

Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नमो शेतकरी योजनेचे ₹२००० जमा, तुमच्या खात्यात पैसे आले का? असं करा चेक

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये?

Crime News : पुण्यातील गँगवॉरची पनवेलमध्ये पुनरावृत्ती, गोल्डन मॅनचा राजकुमार म्हात्रेवर जीवघेणा हल्ला

Vice President Election : कुणाचा गेम होणार? मतदानाआधीच ३ पक्षाची माघार, दिल्लीत मोठ्या घडामोडी

SCROLL FOR NEXT