Prahar Sanghatana : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांच्याबद्दल आमदार रवी राणा यांनी बिनबुडाचे आरोप केले आहेत. आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांची जाहीर माफी मागावी अऩ्यथा अमरावती येथे तीव्र आंदाेलन छेडू असा इशारा राज्यभरातील प्रहार संघटनेतील कार्यकर्ते देऊ लागले आहे. आज (शनिवार) राज्यातील बहुतांश जिल्ह्यात प्रहार संघटनेने आमदार राणांच्या वक्तव्याचा निषेध करीत आंदाेलन केले. (Prahar Sanghatana Latest Marathi News)
जालन्यात आंदाेलन
जालन्यात (jalna) प्रहार दिव्यांग क्रांती संघटनने आमदार बच्चू कडू यांच्याविरुध्द गरळ ओकणाऱ्या आमदार रवी राणाचा निषेध असाे अशा घाेषणा दिल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार रवी राणा यांच्या पुतळ्याला जोडे मारले. प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील छत्रपती संभाजीराजे उद्याना समोरील संभाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर एकत्र येत हे आंदाेलन केले. कार्यकर्त्यांनी रवी राणा यांच्या विरुद्ध घोषणजी करत त्यांच्या फोटोला जोडे मारत कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध करत पुरावे द्या अन्यता जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. (Jalna Latest Marathi News)
मलकापूरात आंदाेलन
मलकापूर येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात आमदार रवी राणा (ravi rana) यांचा फोटो असलेल्या बॅनरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. राणा यांनी केलेल्या वक्तव्याचा तसेच प्रहारचे संस्थापक अध्यक्ष कडू यांच्या बद्दल चुकीचे व कोणताही आधार नसलेले खोटे आरोप करीत गरळ ओकून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेल्याचे कार्यकर्त्यांनी नमूद केले. (Buldhana Latest Marathi News)
सोलापूरात आंदाेलन
सोलापुरातील प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आज आमदार रवी राणा यांच्या विराेधात आक्रमक झाले हाेते. सोलापुरात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी चक्क आमदार रवी राणा यांच्या प्रतिमेचे प्रतिकात्मक अंतयात्रा काढली. आमदार रवी राणा हे सातत्याने बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यांनी वेळीच बच्चू कडूंची (bacchu kadu) जाहीर माफी मागितली नाहीं तर येत्या १ नोव्हेंबरला अमरावतीमध्ये जाऊन रवी राणा यांचा पुतळा जाळण्याचा इशारा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दिला. या आंदाेलनात अजित कुलकर्णी (शहराध्यक्ष) यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले हाेते. (Solapur Latest Marathi News)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.