Yashomati Thakur criicises maharashtra government Saam Tv
महाराष्ट्र

अनाथांच्या वाट्याचे खोके, घेऊन गेले बोके, यशोमती ठाकूरांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संगमनेर : खोक्यांचा गोंधळ घालत बोक्यांनी अनाथ बालकांचा निधी पळवून लावला आणि पूर्वी मंजूर असलेली २५०० रुपये ही रक्कम देखील निधी स्वरूपात देण्याबाबतीतच्या निर्णयावर या निर्दयी सरकारने रोख आणली, असा आरोप करीत आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांना पत्र लिहिले असल्याचे काँग्रेस नेत्या तथा माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले. संगमनेर येथील मथुरागिणी महोत्सवातील महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. (Former Minister yashomati thakur criticises maharashtra government)

स्वातंत्र्यसैनिक सहकारमहर्षी तिर्थरूप भाऊसाहेब थोरात व हरीतक्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंदे जयंती महोत्सव निमित्ताने संगमनेर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने मथुरागिणी महोत्सव २०२२ चे उदघाटन काँग्रेस नेत्या तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्याहस्ते तसेच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, कांचन थोरात, सौ दुर्गा सुधीर तांबे, सत्यजित तांबे, डॉ.जयश्री थोरात, उत्कर्षा रुपवते, युवा कीर्तनकार ह.भ.प.मुक्ता आणि उन्नती चाळक आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या कार्यक्रमात बोलताना काँग्रेस नेत्या तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की,आमचं सरकार आलं त्यावेळी बालसंगोपन, अनाथ बालक, एकल महिला यांच्यासाठी सहायता निधी हा केवळ ४०० रुपये इतका शुल्लक होता,आम्ही हा निधी वाढवून ११२५ रुपये केला.मी मात्र समाधानी नव्हते,अजित पवार यांच्यामागे मी तगादा लावला आणि त्यांनी देखील विलंब न करता माझ्या मागणीचा स्वीकार करत हीच रक्कम २५ रुपये इतकी करू असं ठरलं.

राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये या बाबत घोषणा देखील करण्यात आली आणि मी ठरवलं की, जर आपलं सरकार पूर्ण वर्षे राहील तर या निधी मध्ये पुन्हा १०० % वाढ करून हा निधी ५ हजार रुपये इतका करू. परंतु, खोक्यांचा गोंधळ घालत बोक्यांनी अनाथ बालकांचा निधी पळवून लावला आणि पूर्वी मंजूर असलेली २५०० रुपये ही रक्कमही निधी स्वरूपात देण्याबाबतीतच्या निर्णयावर या सरकारने रोख आणली,असं त्या म्हणाल्या.

याबाबतीत मी उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून किमान अनाथ मुलांना तरी आपल्या सरकारने रोखू नये,अशी विनंती केली आहे. ही मान्यता मान्य न झाल्यास युद्धदेखील करण्याची धमक आपल्यात आहे,असे म्हणत महाराष्ट्रातील जनतेची साथ आपल्याला मिळेल असा विश्वास ॲड.यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

संस्कृती बदलतेय आणि उपद्रव वाढतोय

सध्याच्या राजकारणात अपेक्षा बदलत आहेत,अपेक्षा वाढत आहेत आणि त्यात गैर काही नाही.परंतु संस्कृती बदलतेय आणि उपद्रव वाढतोय ही मात्र चिंतेची बाब आहे. तसेच समाजामध्ये एकोपा जपून ठेवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ॲड.यशोमती ठाकूर यांनी केले.सत्तापालट झाल्यापासून येथे देखील उपद्रव वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पंरतु, घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही.इतकं खंबीर आणि स्थिर नेतृत्व आपल्या बरोबर आहे.आपण केवळ पुढे मार्गक्रमण करायचं,असा सल्ला यशोमती ठाकूर यांनी यावेळी उपस्थित जनतेला दिला.

१५ रुपयांची गोष्ट आपण ८वर्षांआधी ऐकली.परंतु आपल्या हाती मात्र काही लागलं नाही.सरकार पाडलं त्याच्या एक महिन्याआधी मी प्रत्येक आंगणवाडी सेविकेस १५ हजार रुपये आणि मदतनीस यांस १२ हजार रुपये रोख मिळाले पाहिजेत,असा प्रस्ताव आम्ही ठेवला होता.निर्णय आता या सरकारच्या हाती आहे आणि आम्ही हा प्रस्ताव मंजूर करून घेणारच,असा विश्वास यावेळी ॲड.यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

माणसं जपणारं संगमनेर प्रेरणादायी

यादरम्यान माणसं आणि संसार जपण्याची संगमनेरमधील कला माझ्यासाठी प्रेरणादायी असून ही कला मी येथून घेऊन जात असल्याचे मत काँग्रेस नेत्या तथा माजी मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले. संगमनेर येथील मथुरागिणी महोत्सव 2022च्या निमित्ताने महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. युवा कीर्तनकार ह.भ.प. मुक्ता आणि उन्नती चाळक या दोघींचा सत्कार ॲड.यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यशोमती ठाकूर यांचे कौतुक करताना त्यांच्या संघर्षमयी प्रवासाचे कौतुक केले.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण, विराट गेला होता हॉस्पिटलमध्ये, सरावावेळी २ फलंदाज जायबंदी

Hydrogen Railway: देशात लवकरच येणार हायड्रोजनवर चालणारी रेल्वे; वैशिष्ट्ये काय? जाणून घ्या

Pune News : मुलांची परीक्षा फी भरली, आयोगानं थेट उमेदवाराला पाठवली नोटीस!

Almond Milk: बदामाचे दूध प्यायल्यास काय होते?

Health: घसादुखीमुळे होऊ शकतात ५ धोकादायक आजार, चुकूनही दुर्लक्ष करु नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT