सावधान! अवघ्या पाच सेंकदात एटीएम झालं हॅक; बँकांना लाखो रुपयांचा गंडा

पाच सेकंदात एटीएम हॅक करून बँकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार भांडुपमध्ये समोर आला आहे
mumbai crime news
mumbai crime news saam tv

Mumbai Crime News : पाच सेकंदात एटीएम (ATM) हॅक करून बँकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार भांडुपमध्ये समोर आला आहे. या प्रकारमुळे भांडुपमध्ये एकच खळबळ उडाली. भांडुप पोलिसांनी (Police) याच प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात दोन जणांना भांडुप पोलिसांनी आतापर्यंत ताब्यात घेतल आहे. (Mumbai Crime News In Marathi)

mumbai crime news
धक्कादायक! मुंबईत शाळकरी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांची विक्री; पोलिसांनी केली महिलेला अटक

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणामध्ये राहणारे आरिफ खान आणि तारीख खान यांना एका ठराविक कंपनीच्या एटीएम मशीनमधून पैसे काढताना ट्रांजेक्शन करायचे. दोघ्यांना अवघ्या पाच सेकंदात एटीएम मशीन हॅक कशी करायची याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ते एन आर सी कंपनीचे एटीएम असलेल्या बँका शोधून काढायचे. तसेच त्या ठिकाणी जाऊन एटीएम पिन टाकल्यानंतर ट्रेमध्ये पैसे येताक्षणी ते एटीएम हॅक करायचे. त्यामुळे बँकांच्या अकाउंटमध्ये या व्यवहाराची नोंद व्हायची नाही. मात्र आरोपींना रोख रक्कम मिळायची.

आतापर्यंत या दोघांनी विविध एटीएम मधून दोन लाख ५५ हजाराची रोख रक्कम अशाप्रकारे एटीएम हॅक करून काढली आहे. भांडुप मधील अभुदय बँकेच्या एटीएममध्ये एक व्यक्ती संशयास्पदरीत्या वारंवार ट्रांजेक्शन करत असल्याचा बँकेच्या कर्मचाऱ्यांना दिसून आलं. त्यावेळी त्यांनी त्याची चौकशी करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

mumbai crime news
बॉम्बस्फोट करून भारतात हाहाकार माजवणार, धमकी देणाऱ्याच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या

पोलिसांनी त्यानंतर त्याची उलट तपासणी करून त्याच्या आणखी एका साथीदाराला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतलं. ही एटीएम सुविधा पुरविणारी एनआरसी कंपनीला या संदर्भात बँक प्रशासन आणि पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार या कंपनीने आपली सर्व एटीएम ही बंद केली आहेत. या दोघांनी नेमका आतापर्यंत बँकांना कितीचा गंडा घातला आहे, याचा अधिक तपास भांडुप पोलीस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com