Sanjay Pandey | माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना 'सीबीआय'कडून अटक

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE), फोन टॅपिंग प्रकरणी अटक केली आहे.
Sanjay Pandey News updates
Sanjay Pandey News updatesSaam TV
Published On

Sanjay Pandey News : मुंबईचे माजी पोलीस (Police) आयुक्त संजय पांडे यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE), फोन टॅपिंग प्रकरणी अटक केली आहे. पांडे यांना याआधीच ईडीने अटक केली होती. न्यायालयाने आता संजय पांडे यांना अधिक तपासासाठी ४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना या आधीच ईडीने अटक केली होती. ईडीकडून त्यांची चौकशी सुरू होती. ईडीने एनएसईचे माजी सीईओ रवि नारायण, चित्रा रामकृष्ण , माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या विरुद्ध १४ जुलै रोजी पीएमएल कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला होता.

या तिघांच्या विरुद्ध सीबीआयने गुन्हा नोंद केला होता. यानंतर आज शनिवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE), फोन टॅपिंग प्रकरणी अटक केली आहे. यामुळे संजय पांडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Sanjay Pandey News updates
सावधान! अवघ्या पाच सेंकदात एटीएम झालं हॅक; बँकांना लाखो रुपयांचा गंडा

काय आहे प्रकरण ?

संजय पांडे यांनी २००१ मध्ये आयसेक सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड नावाने एक कंपनी सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता, पण तो राजीनामा स्वीकारला गेला नाही. त्यानंतर ते पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाल्यावर त्यांनी आपली कंपनी मुलाला चालवायला दिली.

२०१० आणि २०१५ च्या दरम्यान Isec Services Pvt Ltd नावाच्या फर्मला NSE सर्व्हर आणि सिस्टम्सचे IT ऑडिट कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. यावेळी घोटाळा झाला होता. या प्रकरणाची चौकशी आता ईडी करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com