Tanajirao Sawant Mother Death News : महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तानाजी सावंत यांच्या मातोश्री भिवराबाई तुकाराम सावंत (Bhiwarabai Sawant death news today) यांचे वयाच्या १०५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या शंभरीनंतरही त्या कौटुंबिक आणि सामाजिक कार्यात नेहमीच मार्गदर्शक ठरल्या होत्या.
भिवराबाई तुकाराम सावंत यांचं सोलापूर जिल्ह्यातील वाकाव (ता. माढा) येथे राहत्या घरी मंगळवारी रात्री निधन झाले. भिवराबाई तुकाराम सावंत यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शोक व्यक्त केला असून सावंत परिवाराचे सांत्वन केले आहे.
सकाळी दहा वाजता वाकाव येथील त्यांच्या शेतामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आक्का या टोपण नावाने त्यांची संपूर्ण परिसरामध्ये ओळख होती. तानाजी सावंत हे सकाळीच वाकावमध्ये अंत्यसंस्कारासाठी दाखल झाले.
पतीच्या निधनानंतर भिवराबाई सावंत यांनी अतिशय कठीण परिस्थितीत ५ मुलांचा सांभाळ केला. त्यांनी मोठ्या कष्टाने आणि हिमतीने हा संसार पुढे नेला. काही काळापूर्वी त्या पुण्यातील लहान मुलगा प्रा. तानाजीराव सावंत यांच्याकडे उपचारासाठी आणि राहण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर त्या माढा तालुक्यातील आपल्या मूळ वाकाव गावी परतल्या.
त्यांचे मोठे पुत्र प्रा. शिवाजीराव सावंत हे मागील अनेक वर्षांपासून आईची मनापासून सेवा करत होते. भिवराबाई यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांतील अनेक मान्यवर वाकाव गावी दाखल झाले आहेत. सावंत कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची ताकद मिळो, अशी प्रार्थना सर्वजण करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.