भाजपची मोठी कारवाई; ३ बड्या नेत्यांना ६ वर्षांसाठी केले निलंबित

BJP Suspends Three Leaders : किरण सरनाईक यांच्या विरोधात उमेदवारी कायम ठेवल्याने भाजपने संगीता शिंदे, चंद्रशेखर भोयर आणि सुमित पवार या तीन नेत्यांवर कारवाई केली आहे. तिन्ही नेत्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केल्याची माहिती जाणून घ्या.
Maharashtra Politics:
Maharashtra BJPSaam tv
Published On: 

Amravati teachers constituency election latest news : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी करणाऱ्या नेत्यांवर भाजपने अत्यंत कठोर कारवाई केली आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार किरण सरनाईक यांच्या विरोधात आपली उमेदवारी कायम ठेवल्यामुळे भाजपमधील काही जणांनी बंडखोरी केली होती. पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या या बंडखोरांवर आता भाजपने थेट निलंबनाचा बडगा उगारला आहे.

या नेत्यांवर झाली कारवाई

पक्षाच्या आदेशाविरुद्ध जाऊन उमेदवारी कायम ठेवल्यामुळे संगीता शिंदे, चंद्रशेखर भोयर आणि सुमित पवार या भाजप नेत्यांवर पक्षाने मोठी कारवाई केली आहे. या तिन्ही बंडखोरांना पक्षातून तब्बल सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. महायुतीमधील अधिकृत उमेदवाराविरोधात जाऊन काम करणाऱ्यांवर भाजपने कडक भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

Maharashtra Politics:
मोदी सरकारचा मोठा निर्णय! थेट ५ मोठ्या योजनांची नावं बदलली; महिलांसाठीच्या या योजनेचाही समावेश

महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्याविरोधात उमेदवारी कायम ठेवल्याने कारवाईचा निर्णय भाजपने घेतला आहे. महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या पक्षाच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात भूमिका घेतल्याने संबंधित तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Maharashtra Politics:
मोठा निर्णय! जमिनीच्या नियमांत मोठा बदल; 'या' महत्त्वाच्या धोरणाला राज्य सरकारची मंजुरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com