Vinod Kambli  SAAM TV
महाराष्ट्र

Vinod Kambli: मोबाइल दुरुस्तीसाठी 15 हजार नाहीत, 6 महिन्यांपासून मोबाइलविना; विनोद कांबळीवर ही वेळ का आलीय?

Vinod Kambli News: विनोद कांबळी याची बिकट आर्थिक परिस्थिती जगासमोर आली आहे. गेल्या ६ महिन्यांपासून त्याच्याकडे मोबाईल फोन नाही. मोबाईलद्वारे तो कुणाशीही संपर्क साधू शकला नाही. पण या मागचं नेमकं कारण काय?

Bhagyashree Kamble

भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या महिन्यांपासून प्रचंड चर्चेत आहेत. आता तो ठाण्यातील एका रूग्णालयात उपचार घेत असून, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. विनोद कांबळी याची बिकट आर्थिक परिस्थिती जगासमोर आली आहे. गेल्या ६ महिन्यांपासून त्याच्याकडे मोबाईल फोन नाही. मोबाईलद्वारे तो कुणाशीही संपर्क साधू शकला नाही. पण या मागचं नेमकं कारण काय?

विनोद कांबळी सध्या आर्थिक परिस्थितीला झुंज देत आहेत. त्याच्याकडे आधी आयफोन होता. आयफोन काही कारणास्तव बिघडला. नंतर त्यानं मोबाईल फोन रिपेअरसाठी दुकानात दिला. दुकानात १५००० हजारांचे मोबाईल फोनचे बिल झाले. तो आयफोनच्या दुरूस्तीसाठी १५ हजार रूपये देऊ शकला नाही. मोबाईल रिपेअरचे पैसे न भरल्यानं दुकान मालकानं कांबळी यांचा फोन जप्त केला. त्यामुळे अनेक महिन्यांपासून तो कुणाशीही संपर्क साधू शकला नाही.

विनोद कांबळी सध्या ठाण्यातील एका खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत कांबळी यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठल्या झाल्या असून, त्याला युरीनरी इन्फेक्शनचा देखील त्रास असल्याचं आढळून आलं आहे. सध्या त्याची प्रकृती सुधारली आहे. मात्र, त्याची स्मरणशक्ती कमी झाली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

एक काळ होता, जेव्हा कांबळीची एकूण संपत्ती १३ कोटी रूपये होती. पंरतू सध्या त्याचा उदरनिर्वाह हा बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पेन्शनमधून होत आहे. क्रिकेटपटू असल्यानं बीसीसीआय त्याला दरमहा ३० हजार रूपये देते. कांबळीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतात. प्रकृती काहीशी अस्थिर आणि आर्थिक समस्या असली तरीही कांबळी जिद्दीने त्याला लढा देताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT