
Vinod Kambli News: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची अचानक प्रकृती बिघडली. त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो सध्या ठाण्यातील आकृती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. आजारी कांबळीच्या भेटीला शिवसेना नेते प्रताप सरनाईक पोहोचले. त्यांनी विनोद कांबळी उप सचिन तेंडुलकरची आठवण काढत असल्याचे माध्यमांना सांगितले आहे.
भेट घेतल्यानंतर प्रताप सरनाईकांनी कांबळीच्या प्रकृतीची माहिती दिली. ते म्हणाले, "विनोद कांबळीची प्रकृती स्थिर आहे. मला सचिनची आठवण येते. माझ्या आचरेकर सरांची आठवण येते असं तो म्हणत आहे. तो जुन्या आठवणींमध्ये रमलेला आहे. आयुष्याची सेंच्युरी मारायची आहे असं आम्ही त्याला सांगितलं आहे. गरज नसताना त्याने काही चुका केल्या. त्याची शिक्षा तो आता भोगतोय. आता पुढे चूक होणार नाही असं त्याने कबूल केलं आहे. भविष्यात क्रिकेटच्या मैदानात धावणार असल्याचा विश्वास त्याने व्यक्त केला आहे."
प्रताप सरनाईक यांनी "वानरसेना नावाची आमची सामाजिक संस्था आहे. या संस्थेद्वारे गरजू व्यक्तीला महिन्या-दोन महिन्यात आर्थिक मदत केली जाते. कांबळीबद्दल काही महिन्यांपूर्वी वानरसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालं. आमच्या संस्थेमार्फत २० लाख रुपये जमा झाले आहेत. ही रक्कम कांबळीच्या पत्नीच्या खात्यामध्ये जमा करायला सांगितलं आहे. मी एकनाथ शिंदेंच्या सूचनेवरुन इथे भेटायला आलो आहे." असेही सांगितले.
विनोद कांबळीच्या उपचाराची जबाबदारी शिवसेनेच्या नेत्यांनी उचलली आहे. उपचारासाठीची रक्कमही त्यांनी कांबळीच्या कुटुंबियांकडे सुपूर्त केली आहे. गंगुबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल, इंदिराबाई बाबुराव सरनाईक हॉस्पिटल आणि आकृती हॉस्पिटल हे तीनही रुग्णालय प्रत्येक वेळी उपचारासाठी कटिबद्ध असणार आहेत, अशी ग्वाही देण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.