
India Playing XI: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२५ कोण जिंकणार याकडे सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना उद्या म्हणजे २६ डिसेंबर रोजी सुरु होणार आहे. मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने येणार आहेत. बॉक्सिंग डेसाठी ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे. पण अजूनही भारतीय संघाचे ११ शिलेदार कोण असणार हे गुलदस्त्यात आहे. मागील तीन कसोटी सामन्यांच्या निकालावरुन भारतीय संघामध्ये बदल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेची सुरुवात झाली. रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये जसप्रीत बुमराहने कर्णधारपद स्विकारले आणि पहिला कसोटी सामना जिंकला. रोहित ऑस्ट्रेलियाला परतल्यानंतर त्याने पुन्हा कर्णधारपदाची धुरा हाती घेतली. पुढील दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये तोच कर्णधार होता. यातील अॅडलेटमधील दुसऱ्या सामन्यामध्ये भारताचा पराभव झाला. त्यानंतर गाबा कसोटी सामना अनिर्णित राहिला.
पहिल्या सामन्यात रोहित शर्माच्या जागी के. एल. राहुल सलामीसाठी आला. सलामीच्या स्थानावर त्याने चांगली कामगिरी केली आणि रोहितने आपली सलामीची जागा दोन सामन्यांसाठी सोडली. या दोन्ही सामन्यांमध्ये रोहित शर्मा सहाव्या क्रमांकावर खेळायला आला. दोन्ही कसोटी सामन्यांच्या दोन्ही डावांमध्ये शर्माला चांगली कामगिरी करता आली नाही. हे सलामीच्या जागी सहाव्या क्रमांकावर खेळल्याने झाले असे म्हटले गेले.
कसोटी सामन्यांमध्ये फलंदाजीच्या क्रमात बदल केल्याने रोहितचा खेळ बिघडल्याने आता चौथ्या सामन्यामध्ये भारताच्या प्लेईंग ११ मध्ये बदल होऊ शकतो असे म्हटले जात आहे. यानुसार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल सलामीसाठी उतरतील. शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावरुन थेट सहाव्या स्थानावर जाण्याची शक्यता आहे.
तेव्हा सलामीवीरांनंतर तिसऱ्या क्रमांकावर के. एल. राहुल, चौथ्या क्रमांकावर विराट कोहली, त्यानंतर रिषभ पंत, गिल येऊ असा क्रम असू शकतो. रविंद्र जडेजाने मागील दोन्ही कसोटींमध्ये चांगला खेळ केला होता. त्यामुळे त्याचे स्थान टिकून आहे. तर नितीश कुमार रेड्डीच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला खेळण्याची संधी दिली जाऊ शकते.
भारताचे संभाव्य प्लेईंग ११ः रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, विराट कोहली, रिषभ पंत, शुबमन गिल, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह
ऑस्ट्रेलियाचे प्लेईंग ११ः उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅविस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, स्कॉट बोलंड
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.