
नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीवर उपचार सुरु आहेत. त्याच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. कांबळीला मंगळवारी ताप आला होता. या रुग्णालयात डॉक्टरांच्या निरीक्षणाखाळी कांबळीवर उपचार सुरु असल्याची माहिती हाती आली आहे. यावेळी सचिन तेंडुलकरचेही कांबळीने आभार मानले.
विनोद कांबळीला मागील शनिवारी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरु आहेत. कांबळीने युट्यूब चॅनलवरीलही त्याच्या तब्येतीविषयी सांगितलं होतं. 'मला लघवीशी संबंधित समस्या होती. त्यावेळी मी चक्कर येऊन पडलो. माझा मुलगा येशूने मला उचचलं. त्यानंतर पायावर उभं केलं. माझी मुलगी आणि पत्नी मदतीसाठी धावली. त्यावेळी माझ्या शस्त्रक्रियेचा खर्च सचिन तेंडुलकरने केला होता'.
रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या विनोद कांबळीने माध्यमांना प्रकृतीविषयी प्रतिक्रिया दिली. यावेळी विनोद कांबळीने म्हटलं की, 'मला खूप चांगलं वाटत आहे. मी नेहमी म्हणत आलो आहे की, आम्ही चॅम्पियन आहोत. मी कधीच क्रिकेट सोडणार नाही. मी आतापर्यंत अनेक शतक ठोकले आहेत. मी द्विशतक ठोकले आहे. माझ्या कुटुंबात तीन डावखुरे खेळाडू आहेत. मी सचिन तेंडुलकरचे आभार मानतो. त्याचे आशीवार्द नेहमी माझ्यासोबत आहेत'.
दरम्यान, विनोद कांबळीला लघवीची समस्या जाणवत होती. त्याला क्रॅम्प आल्याने चालणेही अशक्य झालं होतं. ठाण्यातील एका खासगी रुग्णलायात त्याच्यावर उपचार सुरु असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉ. विवेक त्रिवेदी यांनी सांगितलं. विनोद कांबळीच्या काही चाचण्या करण्यात आल्या आहेत. तसेच त्याच्या मेंदूत गुठळ्या झाल्याचे आढळले आहे.
विनोद कांबळीने १९९१ साली भारतीय संघाकडून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पुढे १९९३ साली टीम इंडियसाठी कसोटी सामन्यात पदार्पण केलं होतं. विनोद कांबळी हा जलद १००० कसोटी धावा करणारा फलंदाज आहे. त्याने १४ डावात ही कामगिरी केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.