Ankush Dhavre
भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सध्या तुफान चर्चेत आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीसाठी चर्चेत असणारा विनोद कांबळी आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.
काही दिवसांपू्र्वीच विनोद कांबळींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
ज्यात त्यांची प्रकृती स्थिर नसल्याचं दिसून आलं होतं.
आजारपणासह त्यांची आर्थिक स्थितीही स्थिर नसल्याचं म्हटलं जात आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, बीसीसीआयकडून त्यांना दरमहा ३० हजार रुपये पेन्शन म्हणून दिले जातात.
पेन्शन हे त्यांच्या कमाईचे एकमेव साधन आहे.
याचा अर्थ असा की, त्यांची दिवसाची एकूण कमाई केवळ १ हजार रुपये इतकीच आहे.