Kalyan Latest News  Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : वाद टोकाला गेला, महिलेकडून भर रस्त्यात माजी नगरसेवकाला मारहाण; व्हिडिओ व्हायरल, VIDEO

Kalyan News : कल्याणमध्ये महिलेकडून भर रस्त्यात माजी नगरसेवकाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

कल्याण : कल्याणमध्ये माजी नगरसेवकाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. माजी नगरसेवकाला महिलेने मारहाण केल्याची घटना घडली आहे. भररस्त्यात माजी नगरसेवकाला मारहाण केली. रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर महिलेने मारहाण केल्याचं समोर येत आहे. या माराहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला महिलेकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून दोघांमध्ये वाद झाला होता. राणी कपोते असे मारहाण करणाऱ्या महिलेचे नाव आहे. राणी कपोते पक्षाशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर मोहन उगले असे मारहाण झालेल्या माजी नगरसेवकाचं नाव आहे. माजी नगरसेवकाच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

नेमकं काय घडलं?

शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला एका महिलेने भर रस्त्यात मारहाण केल्याची केली. कल्याणच्या अहिल्याबाई चौक परिसरात ही मारहाणीची घटना घडली. मोहन उगले असे या माजी नगरसेवकाचे नाव आहे. तर मारहाण करणाऱ्या महिलेचे नाव राणी कपोते असे आहे. काँक्रीट रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी श्रेयावरून काल दोघांमध्ये देखील वाद झाल्याचा पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आज पुन्हा या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला.

राणी कपोते या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी शिंदे गटाचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी कायद्याने महिलांना संरक्षण आहे. आत्तापर्यंत त्या महिलेला आम्ही काहीच बोललो नाही आणि बोलणार सुद्धा नाही. मात्र पक्षाने अशा लोकांवर योग्य ती कारवाई केली पाहिजे, अशी मागणी मोहन उगले यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CNG-PNC Price Cut: सर्वसामान्यांना मोठा दिलासा, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी घसरण, नवे दर काय?

Maharashtra Live News Update: बिबट्याचा मानवी वस्तीजवळ वावर वाढला

Hingoli Crime : मानेवर, पोटात चाकूने वार केले, हिंगोलीत भर रस्त्यात हल्ल्याचा थरार; तरुण गंभीर जखमी

Income Tax Slab: टॅक्स भरणाऱ्यांना दिलासा नाहीच; अर्थसंकल्पात नेमकी काय घोषणा झाली?

दोन्ही राष्ट्रवादी कधीच एकत्र येणार नाहीत, भाजप नेते पीयूष गोयलांचा मोठा दावा, शरद पवारांवरही वक्तव्य

SCROLL FOR NEXT