Kunal Kamra : सुपारी घेतली नाही, माफी मागणार नाही; एकनाथ शिंदेंवरील टीकेवर कुणाल कामरा ठाम

Kunal Kamra News : कुणाल कामराच्या वक्तव्याने नवा वाद पेटलाय. कुणाल कामराच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुपारी घेऊन वक्तव्य केल्याचा आरोप केला. मात्र, मी सुपारी घेतली नाही. माफी मागणार नसल्याचं कुणाल कामराने म्हटलं आहे.
Kunal Kamra News
Kunal KamraSaam tv
Published On

कुणाल कामराच्या गाण्याने नवा वाद पेटला आहे. कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकात्मक गाणे तयार केल्याने शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिंदेंच्या शिवसैनिकांनी काल कुणार कामराचा खारमधील स्टुडिओ फोडला होता. तसेच त्याच्याविरोधात पोलिसांतही तक्रार दिली. कुणाल कामराने सुपारी घेऊन एकनाथ शिंदेंची बदनामी केल्याचा आरोप महायुती आणि मुख्यमंत्र्यांनी आरोप केला आहे. आरोपानंतर मी सुपारी घेतली नाही. मी माफी मागणार नाही, असं म्हणत कुणाल कामराने वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हटलं.

कुणाल कामराच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाला आहे. कामराने सुपारी घेऊन वक्तव्य केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. त्यानंतर कुणाल कामराने प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबई पोलिसांनी कुणाल कामराची फोनवरच प्राथमिक चौकशी केली. वक्तव्य मागे घेणार नसल्याचे कामराने पोलिसांना सांगितलं आहे. कोर्टाने सांगितल्यावर माफी मागेन असंही त्याने म्हटलं आहे.

'मी सुपारी घेतली नाही. बँक खाती तपासा, असं कामराने पोलिसांना सांगितलं. कामराच्या वक्तव्यानंतर पोलीस काय भूमिका घेतात, हे पाहावे लागणार आहे. दुसरीकडे कामराच्या विरोधात पोलिसांत तक्रार देखील नोंदवण्यात आल्या आहेत. कुणाल कामराच्या वक्तव्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलन देखील होऊ लागले आहेत. अकोल्यातील शिवसैनिकांनी कामराच्या विरोधात घोषणाबाजी करून जोड मारो आंदोलन केले. कुणाल कामराचा शो झालेल्या खारमधील स्टुडिओची रविवारी शिवसैनिकांनी तोडफोड केली.

Kunal Kamra News
Kunal Kamra News: '...मरने से मैं कभी डरता नहीं', शिंदे सेनेच्या अॅक्शनवर कुणाल कामराची पोस्ट; 'त्या' फोटोवरून वाद पेटणार
Kunal Kamra News
Kunal kamra : एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवली, कुणाल कामराविरोधात शिवसैनिक आक्रमक, सेटची तोडफोड | VIDEO

स्टुडिओवर कारवाई होणार?

खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांधलेल्या स्टुडिओवर बीएमसीने पकड घट्ट केली आहे. महानगरपालिकेचे अधिकारी युनी कॉन्टिनेंटल स्टुडिओमध्ये दाखल झाले आहेत. स्टुडिओच्या बेकायदेशीर भागावर कारवाई होऊ शकते. महापालिका सहआयुक्त विनायक विसपुते घटनास्थळी पोहोचले आहेत. खारमधील याच स्टुडिओमध्ये स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने वादग्रस्त गाणे गायले होते. स्टुडिओचा वीजपुरवठा देखील खंडित केला जाऊ शकतो. कारण अदानी इलेक्ट्रिसिटीशी संबंधित अधिकारीही घटनास्थळी पोहोचले होते.

Kunal Kamra News
Pune Crime : पुणे हादरलं! शाळेत निघालेल्या चौथीच्या विद्यार्थिनीवर नराधमाची नजर; रस्त्यात एकटं गाठून लैंगिक अत्याचार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com