Maharashtra Politics Saam Tv News
महाराष्ट्र

भाजपचा दोन ठिकाणी राजकीय स्ट्राईक! शरद पवार गटाला धक्का, बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश

Maharashtra Politics: वसईतील बविआचे माजी नगरसेवक छोटू आनंद यांच्यासह अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये दाखल. जळगाव जिल्ह्यातील शरद पवार गटातील अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश.

Bhagyashree Kamble

  • वसईतील बविआचे माजी नगरसेवक छोटू आनंद यांच्यासह अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये दाखल.

  • जळगाव जिल्ह्यातील शरद पवार गटातील अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश.

  • पक्षप्रवेश सोहळा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न.

  • शीख बांधव, काँग्रेस कार्यकर्ते आणि आदिवासी समाजातील मोठा सहभाग.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच मुंबईच्या कार्यालयात आज जम्बो पक्षप्रवेश पार पडला. वसईमधील बविआच्या माजी नगरसेवकासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही भाजपची साथ देण्याचा निर्णय घेतला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी यावेळी त्यांचे स्वागत गेले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या जळगाव जि. प. माजी सदस्य संभाजी पाटील, डी. पी. साळुंखे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी भाजपाची साथ देण्याचा निर्णय घेतला. आज त्यांचा भाजप कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा पार पडला. तसेच वसई येथील बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक छोटू आनंद यांच्यासह 'बविआ'च्या अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी सर्वांचे स्वागत केले. मुंबईतील प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला आमदार स्नेहा दुबे पंडीत, आ. राजेश वानखेडे, महिला मोर्चा प्रदेश सचिव अपर्णा पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस बिजेंद्र कुमार, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.

वसईमध्ये भाजपची ताकद वाढली

बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये अनेक शीख बांधवांचा समावेश आहे. बविआ विभाग प्रमुख राजू इस्साई, रविंदर सिंह आनंद, काँग्रेसचे करणदीप सिंह अरोरा, गुरजीत सिंह छाबरा, गुरमीत सिंह छाबरा, चरणजित सिंह सभरवाल नरेंद्रपाल सिंह माखिजा, गुरजिंद सिंह चावला, सुकदेव सिंह, भूपिंदर सिंह हंसपाल, मनजीत लांबा, दिलबाग सिंग आणि हवाई दलातील निवृत्त अधिकारी सुखदेव सिंह बाथ आदींचा समावेश आहे.

जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला धक्का

जळगाव जिल्हयातील शरद पवार गटाच्या चोपडा पंचायत समिती माजी सभापती भरत पाटील, गोपाल महाजन, राजेंद्र पाटील, अनिल पाटील, अशोक पाटील, अनिल महाजन आदींनी तसेच आदिवासी भिल्ल समाजातील राहुल दळवी, काशिनाथ दळवी, आकाश दळवी, अंकुश दळवी, संदीप दळवी आदी असंख्य कार्यकर्त्यांनी राहुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune School: शिक्षणाचा बाजार मांडलाय यांनी...फी न भरल्यानं शाळेनं विद्यार्थ्यांचे फोटो केले व्हायरल | VIDEO

Dharashiv: स्मशानभूमीच्या जागेवरून दोन गटात तुफान राडा, दगडफेकीत ५ पोलिस जखमी; पाहा VIDEO

Team India : भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ! गंभीरनंतर आता धोनीवर ऑलराउंडरचा धक्कादायक आरोप

CIBIL Score Update : CIBIL स्कोअर नसेल तरी कर्ज मंजूर! जाणून घ्या नियम

Chocolate Modak Recipe : गणपतीसाठी खास बनवा चॉकलेट मोदक, बाप्पासोबतच मुलेही होतील खुश

SCROLL FOR NEXT