Forest department arrests 14 accused for hunting wild birds in Bhandara अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

Bhandara: रानपाखरांची शिकार करणाऱ्या १४ आरोपींना वन विभागाने केली अटक

Bhandara: रानपाखरांच्या शिकार प्रकरणी 14 जणांना अटक; 3 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, लाखांदूर वनविभागाची कारवाई...

अभिजीत घोरमारे

भंडारा: रात्रीच्या अंधारात शेतशिवारात नॉयलॉन जाळ्याच्या (Nylon mesh) सहाय्याने रानपाखरांची (Wild Birds) शिकार (Hunting) करणाऱ्या14 आरोपींना लाखांदूर (Lakhandur) वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी (Forest Workers) सापळा रचून अटक केली आहे. या कारवाईत 3 लाख 80 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त (Confiscated) करण्यात आला आहे. रानपाखरांची शिकार (Wild Birds) करणाऱ्या शिकाऱ्यांविरोधात वन विभागाने केलेली पहिलीच सर्वात मोठी कारवाई असल्याने तालुक्यातील अन्य शिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. (Forest department arrests 14 accused for hunting wild birds in Bhandara)

हे देखील पहा -

हिवाळा ऋतुच्या उत्तरार्धात काही मांसाहारी आंबट शौकीनांकडून रानपाखरांची मांसाहारासाठी मोठी मागणी दिसून येते. सदर मागणीनुसार गत काही वर्षांपासून तालुक्यातील काही शिकारी (Hunting) प्रवृत्तीच्या नागरीकंकडून नॉयलॉन जाळ्याच्या सहाय्याने रात्रीच्या अंधारात विविध रानपाखरांची शिकार केली जाते. या पाखरांमध्ये लावा, तितिर, कवळी, बटर, हरीयल, तनया यांसह अन्य रानपाखरांचा समावेश आहे. दरम्यान, घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास तालुक्यातील रोहणी शेतशिवारात घटनेतील 14 आरोपी सामुहिकरीत्या नॉयलॉन जाळ्याच्या सहाय्याने रानपाखरांची शिकार करीत असल्याची गोपनीय माहिती लाखांदूर वनविभागाला देण्यात आली. सदर माहितीवरुन भंडारा वनविभाग कामाला लागत रोहणी शेतशिवारात सापळा रचून घटनेतील 14 शिकाऱ्यांना मुद्देमालासह रंगेहात पकडले (Arrested) आहे.

याप्रकरणी स्थानिक धर्मापुरी टोली येथील रहिवासी आशिष मोरेश्वर शेंडे (22), खुशाल नत्थु शेंडे 40), राकेश आनंदराव शेंडे (24), ज्योतीराव सुखदेव मेश्राम (25), आशिष सुखदेव मेश्राम (23), किसन तुकाराम शेंडे (26), अरविंद सहादेव शेंडे (25), शरद देविदास शेंडे (32), दिपक शालिकराम मेश्राम (30), सेवक सिताराम शेंडे (46), अमर अशोक शेंडे (27), गणेश सहादेव शेंडे (32), प्रदुम्मन मोरेश्वर शेंडे (22) आणि अमोल शंकर मेश्राम (24) आदिंविरोधात वन कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करुन अटक केली आहे.

यावेळी आरोपीकडून कवळी पक्षी एकुण 45 नग पैकी 42 जिवंत तर 3 मृत, मोठी मैना मृत 2 नग, लहान मैना मृत 1 नग, शिकारीकरीता वापरण्यात आलेले नॉयलॉन जाळ्यासह अन्य साहित्य व 6 मोटार सायकल किंमती 3 लाख 60 हजार रुपये व 5 मोबाईल किंमती 20 हजार असा एकुण 3 लक्ष 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान रानपाखरांची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांविरोधात वन विभागाने केलेली पहिलीच सर्वात मोठी कारवाई असल्याने तालुक्यातील अन्य शिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पुढील तपास वन विभाग करीत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT