Farmer News Saam TV
महाराष्ट्र

Farmer News: शेतकऱ्यांची चिंता मिटली; आर्थिक उत्पन्नात होणार वाढ; पशुसंवर्धन विभागाच्या नवीन योजना नेमक्या काय आहेत?

पशुपालक, शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे विविध वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत आहेत.

साम टिव्ही ब्युरो

दीपक क्षिरसागर

Farmer News: ग्रामीण भागातील सुशिक्षित, बेरोजगार, पशुपालक आणि शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे म्हणून पशुसंवर्धन विभागातर्फे नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत अनुदानावर दोन गायी अथवा दोन म्हशी, शेळी गट तसेच एक हजार पक्ष्यांचे कुक्कुटपालन दिले जात आहे. लाभासाठी आपल्या मोबाइलवरूनही अर्ज करता येणार आहेत. (Latest Marathi News)

पशुपालक, शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे विविध वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत आहेत. या योजना पारदर्शकपणे राबविण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येऊन लाभार्थ्यांची निवड केली जात आहे. राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत दोन गायी अथवा म्हशी, १० अधिक एक शेळी गट देण्यात येत आहे. तसेच एक हजार मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीला अर्थसहाय्य केले जात आहे. या योजनेंतर्गत खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्याला ५० टक्के तर अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्याला ७५ टक्के अनुदान दिले जात आहे.

तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्तींसाठी ७५ टक्के अनुदानावर जिल्हास्तरीय विशेष घटक योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत शेळी गट, दोन दुधाळ गायी अथवा म्हशी दिल्या जात आहेत. या योजनांच्या लाभासाठी इच्छुकांना ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजकुमार पडिले यांनी केले आहे.

खेड्यापाड्यात नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलहब्ध व्हाव्यात यासाठी या योजना राबवण्यात येत आहेत. गावात हवामानातील बदलामुळे अनेक शेती (Farm) व्यवसायीक मेटाकुटीला आले आहेत. अनेक ठिकाणी पिकाला योग्य भाव नाही. आलेले पिक पुरेसे नाही. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडत आहेत. अशात याच शेतकऱ्यांना (Farmer) शेतीसह उत्पन्नासाठी आणखीन एक मार्ग असावा म्हणून ही योजना लाभदायी ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut : राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्याच्या धक्क्यातून फडणवीस सावरले नाहीत, संजय राऊतांचा टोला

Bhagavad Gita: भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात कोणती शिकवण मिळते?

...तर बाळाला फेकून देईन अन् मीही आत्महत्या करेल, PCMC अधिकाऱ्याला महिलेची धमकी|VIDEO

Maharashtra Live News Update : गर्दी झाली नाही म्हणून मंत्री चिडल्या, कानाखाली मारण्याची भाषा – रोहित पवारांचा संताप

Video : सैन्यदलातील अधिकाऱ्याचा राडा! विमानतळावरील कर्मचाऱ्यांना मारहाण; एकाचा पाठीचा कणा तुटला, दुसऱ्याचा जबडा फाटला

SCROLL FOR NEXT